कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन ही दिवाळी साजरी करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.Diwali Special: Happy Diwali from PM Modi; Said ….
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचं सावट हळूहळू कमी होत असताना यंदाची दिवाळी देशवासीय उत्साहाने साजरी करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन ही दिवाळी साजरी करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे. देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदींनी ट्विट करत देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि संपन्नता येवो, अशी मी प्रार्थना करत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
दिवाळीच्या पवित्र दिनानिमित्त मी देशातील नागरिकांना शुभेच्छा देतो. माझी इच्छा आहे की हे वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो, असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच पुढे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा असंही ट्विटरवरील संदेशामध्ये लिहिलं आहे. Wishing everyone a very Happy Diwali., असं देखील त्यांनी म्हटलंय.
Diwali Special: Happy Diwali from PM Modi; Said ….
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादव यांना आयएसआयकडून संरक्षण आणि आर्थिक मदत, भाजपच्या मंत्र्यांचा संशय
- केंद्राने बंपर गिफ्ट, भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलव किंमती कमी केल्या, आता महाराष्ट्रातील आघाडी सरकार करणार का?
- शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
- मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती
- कॉँग्रेसमध्ये मद्यपान केलेले चालणार, नव्या संविधानात दिली जाणार सवलत