वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Festival Sales to Hit Record दिवाळीपर्यंत बाजारात अंदाजे ₹३.६ लाख कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे. ही रक्कम जीएसटी, आयकर सवलत, महागाई भत्ता वाढ आणि बोनसमधून येईल. गतवर्षीच्या तुलनेत खरेदी २५% वाढण्याची अपेक्षा आहे. बाजारात येणारा ओघ जीडीपीच्या अंदाजे ०.९% आहे. तज्ञांनुसार १.५ कोटी कुटुंबे सणाची खरेदी करतील. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.Festival Sales to Hit Record
केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवून ५५% केला आहे. याचा फायदा ४९.१९ लाख कर्मचारी आणि ६८.७२ लाख पेन्शनधारकांना होईल. यामुळे बाजारात १०,०८४ कोटी रुपये येतील. केंद्र सरकारने ३० दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. रेल्वे ७८ दिवसांचा बोनस देत आहे. एकत्रितपणे, यामुळे वापरात अंदाजे ₹२७,००० कोटी रुपयांची खरेदी वाढेल. सुमारे २० लाख सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी १५ हजार ते १८ हजार रुपये बोनस मिळेल. यामुळे अंदाजे १५,००० कोटी रुपयांची भर पडेल. १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ४.५ लाख कर्मचाऱ्यांना सरासरी ७,००० रुपये बोनस अपेक्षित आहे. यामुळे अंदाजे ३,५०० कोटी रुपये येतील. जीएसटी कपात आणि आयकर सवलतीमुळे बाजारात अंदाजे २.५ लाख कोटी रुपये येतील. हे जीडीपीच्या ०.७-०.८% इतके आहे. यामुळेच विक्रीत १५% वाढ होऊ शकते. दरम्यान, आरबीआयने बुधवारी आर्थिक आढाव्यात डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिले.Festival Sales to Hit Record
समृद्धीचे ९ मोठे संकेत
१. डीए वाढीचा १.१७ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ, १ जुलैपासून लागू महागाई भत्ता वाढीमुळे केंद्र सरकारवर एकूण १०,०८४ कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडेल. प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी दरमहा ७१० रुपये अतिरिक्त मिळतील. परिणाम : जेव्हा १५ ते १८ राज्ये महागाई भत्ता वाढवतील तेव्हा १ कोटींहून अधिक कुटुंबांना अतिरिक्त पैसे मिळतील. २. सणासुदीला खासगी कर्मचाऱ्यांना मिळणारे बोनस खरेदीची क्षमता वाढवेल.सणासुदीच्या काळात सुमारे ३५-४० लाख खासगी कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल. असोचॅमच्या मते, त्यांना २५,००० कोटी रुपये मिळतील. परिणाम : या बोनसमुळे किरकोळ विक्री, एफएमसीजी, ऑटो क्षेत्रातील विक्रीसह गुंतवणूक, सणातील खर्चही वाढेल.
३. जीएसटी कपातीनंतर ९९% वस्तू स्वस्त झाल्या, ज्यामुळे खरेदी क्षमता वाढेल. जीएसटी कपातीमुळे अनेक वस्तू करमुक्त झाल्या आहेत. इतरांवरील कर १८% वरून १२% आणि १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. परिणाम : अनेक ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त झाल्याने उद्योगांना जास्त मागणी मिळेल. वापर १०-१२% वाढण्याचा अंदाज ४. गतवर्षीच्या तुलनेत या सणासुदीत विक्रीत २०% वाढ होण्याची अपेक्षा. ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशनच्या अंदाजानुसार, या सणासुदीला विक्रीत २.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठता येईल. परिणाम : गतवर्षीच्या तुलनेत हे २०% जास्त आहे. यामुळे घाऊक व किरकोळ व्यापाराला दिलासा मिळेल. या वेळी ही स्थिती जास्त काळ टिकण्याची अपेक्षा.
५.वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये १९% वाढ, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विक्रम मोडला. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या मते, सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्री १९% वाढून ३.९ लाखांवर. परिणाम : ऑटो पार्ट्स, टायर्स, पेट्रोल- डिझेलचा वापर आणि वाहतुकीसंबंधी उद्योगांनाही फायदा होईल. वित्त कंपन्या आणि बँकांनाही फायदा.
६. सोन्याची मागणी १५% वाढण्याची अपेक्षा, ज्याने व्यवसाय २५% वाढेल. जागतिक सुवर्ण परिषदेनुसार,सणासुदीत देशातील सोन्याची मागणी १५% वाढून २०० टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा परिणाम : सोने व्यापाऱ्यांकडील ऑर्डरमध्ये वाढ दिसेल आणि व्यवसाय २०-२५% वाढू शकेल. निर्यातदारांना लक्षणीय फायदा होईल.
७. दाेन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा. अल्पकालीन कॅशफ्लो वाढेल. एनएलबी सर्व्हिसेसच्या अहवालात असे म्हटले की या सणासुदीत अंदाजे २ लाख नोकऱ्या निर्माण होतील. त्यापैकी ७०% नोकऱ्या गिग कामगार असतील. परिणाम : हंगामी उत्पन्न वाढेल. या उत्पन्नातून कपडे, मिठाई, भेटवस्तू, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्सवर खर्च होईल.
८. शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांचा वाटा वाढल्याने लिक्विडिटी वाढेल. अॅसेट अंडर मॅनेजमेंटमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा १० वर्षांपूर्वी २०% होता, तो २८% पर्यंत वाढला. परिणाम : सामान्य गुंतवणूकदारांना नफा होतो तेव्हा ते नवीन फंड/आयपीओमध्ये सहभागास प्रोत्साहित होतात.लिक्विडिटी वाढेल.
९. रिअल इस्टेट मध्ये वार्षिक २३% वाढ होत आहे, सणांमुळे क्षेत्राला मोठा आधार. ऑगस्ट २०२५ मध्ये मूल्यानुसार घरांच्या विक्रीत वार्षिक २३% आणि मासिक ३% वाढ नोंदवण्यात आली. परिणाम : रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजीमुळे सिमेंट, स्टील, फर्निचर, ऑटो, घरगुती ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढते, ज्याचा उद्योगाला आधार मिळतो.
Festival Sales to Hit Record: DA Hike, Bonus, GST Cuts Inject ₹3.6 Lakh Crore into Market
महत्वाच्या बातम्या
- संघ शताब्दी : पुणे महानगरात शताब्दी वर्षात संघशक्तीचे विराट दर्शन; विजयादशमी निमित्त 77 संचलने, 84 शस्त्र पूजन उत्सव!!
- Mohsin Naqvi : पाकिस्तानात गृहमंत्री नक्वींवर राजीनाम्यासाठी दबाव; आशिया कप पराभवानंतर पीसीबी अध्यक्षांविरुद्ध संतापाची लाट
- पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल
- Vijay Kumar Malhotra : भाजप नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे निधन; दिल्लीचे पहिले भाजप अध्यक्ष, मनमोहन सिंग यांचा केला होता पराभव