• Download App
    संपूर्ण देशात 140 कोटी जनतेची 22 जानेवारीला दिवाळी; मकर संक्रांती पासून आठवडाभर सर्व तीर्थक्षेत्रांवर सफाई!!|Diwali on January 22 for 140 crore people across the country; Cleaning at all pilgrimage sites for a week from Makar Sankranti!!

    संपूर्ण देशात 140 कोटी जनतेची 22 जानेवारीला दिवाळी; मकर संक्रांती पासून आठवडाभर सर्व तीर्थक्षेत्रांवर सफाई!!

    • पंतप्रधान मोदींनी दिला भव्य उपक्रम

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लांची 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी देशातल्या 140 कोटी जनतेने घराघरांमध्ये दिवाळी साजरी करावी आणि त्यापूर्वी 14 जानेवारी मकर संक्रांतीपासून देशातल्या सर्व तीर्थक्षेत्रांवर महास्वच्छता अभियान राबवावे, असा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व देशवासीयांना दिला.Diwali on January 22 for 140 crore people across the country; Cleaning at all pilgrimage sites for a week from Makar Sankranti!!

    अयोध्येमध्ये 16000 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी वर उल्लेख केलेला महाउपक्रम देशवासीयांसमोर सादर केला.



    22 जानेवारीच्या राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमात सर्व देशवासीयांनी येण्याची घाईगर्दी करू नये. कारण इथल्या इथल्या व्यवस्थांवर ताण पडेल. फार थोड्या लोकांना निमंत्रण पोहोचू शकले आहे. कारण सुरक्षा व्यवस्थेमुळे सगळ्यांनाच एकावेळी अयोध्येत बोलवणे शक्य नाही. त्यामुळे 140 कोटी देशवासीयांनी आपापल्या घरी श्री राम ज्योत प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी आणि त्यापूर्वी देशातल्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये मकर संक्रांती पासून स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

    550 वर्षांच्या संघर्षानंतर श्री राम लल्ला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. त्या सर्व कालावधीत संपूर्ण देशात सगळीकडे स्वच्छता असावी. तीर्थक्षेत्रे अस्वच्छ नसावीत, याची काळजी सर्व देशवासीयांनी घ्यावी आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

    मी देशातील 140 कोटी नागरिकांना प्रार्थना करतो की, 22 जानेवारीला सर्वांनी श्रीराम ज्योती लावा. दिवाळी साजरी करा. 22 जानेवारीची संध्याकाळ पूर्णपणे झगमगित असायला हवी.

    संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशा प्रसंगी अयोध्येच्या नागरिकांमध्ये उत्साह असणं हे स्वाभाविक आहे. भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि जनाचा मी पुजारी आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच उत्सुक आहे.

    एक काळ असा होता की, रामलल्ला छोट्या तंबूत विराजमान होते. पण आज फक्त रामलल्लाला पक्क घर मिळत नाहीय, तर 4 कोटी गरिबांनादेखील मिळाले आहे. आज भारत कशी विश्वनाथच्या निर्माणासोबत 30 हजारपेक्षा जास्त पंचायत घरे तयार झाली. आज देशात महाकाल महालोकचं निर्माण झालं नाही, तर हर घर हर जल पोहोचले.

    अयोध्येत आज विकासची भव्यता दिसत आहे. काही दिवसांनी भव्यता आणि दिव्यता दोन्ही दिसतील. हीच गोष्ट भारताला 21 व्या शतकात पुढे घेऊन जाणार आहे. देशाच्या इतिहासात 30 डिसेंबरची तारीख खूप ऐतिहासिक राहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजच्याच दिवसी 1943 मध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा जयघोषाचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्याच्या दिवशी जोडल्या गेलेल्या अशा पवित्र दिवशी आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळ संकल्पाला पुढे नेत आहोत.

    आज विकसित भारताच्या निर्माणाला गती देण्याच्या अभियानाला अयोध्या नगरीला नवी ऊर्जा मिळाली. आज इथे 15000 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण झाले आहे.

    इथून पुढे अयोध्यावासीयांनी देशाविदेशातील राम भक्तांचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहावे. कारण 23 जानेवारी नंतर हजारो यात्रेकरू दररोज अयोध्येमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ही अयोध्या नगरी स्वच्छ असायला हवी. सुंदर असायला हवी याची काळजी अयोध्यावासीयांनी घ्यावी. यात्रेकरूंचे खुल्या दिल्याने स्वागत करावे. अयोध्या यात्रा इथून पुढच्या भविष्यात निरंतर चालू राहणार आहे.

    Diwali on January 22 for 140 crore people across the country; Cleaning at all pilgrimage sites for a week from Makar Sankranti!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट