विशेष प्रतिनिधी
हरियाणा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी ‘I.N.D.I.A’ आघाडी तयार केली आहे. मात्र या आघाडीमधील अंतर्गत मतभेद वारंवार उघडकीस येत आहेत. विशेष करून आम आदमी पार्टीकडून ज्याप्रकारे निर्णय जाहीर केले जात आहेत, त्यावरून हे प्रकर्षाने जाणवत आहे. Disagreement in INDIA alliance, Aam Aadmi Party will contest elections on its own in Haryana
आता आम आदमी पार्टीने हरियाणा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’चे सरचिटणीस संदीप पाठक यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा निवडणुकीत एकटाच लढणार आहे आणि कोणत्याही पक्षासोबत जागा वाटून घेणार नाही.
संदीप पाठक म्हणाले, हरियाणात विधानसभा निवडणुका येणार आहेत आणि आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही सर्व राज्यांमध्ये संघटना स्थापन करत आहोत. हरियाणामध्ये मंडळ स्तरापर्यंत आमची संघटना स्थापन झाली आहे. सुमारे १५ दिवसांत हरियाणातील प्रत्येक गावात आमच्या सर्व समित्या तयार केल्या जातील आणि त्यानंतर आम्ही आमची मोहीम सुरू करू. हरियाणातील लोक बदलासाठी उत्सुक आहेत. हरियाणात आम्ही चांगली कामगिरी करू. विधानसभा निवडणूक सर्व जागांवर नक्कीच लढवली जाईल.
Disagreement in INDIA alliance, Aam Aadmi Party will contest elections on its own in Haryana
महत्वाच्या बातम्या
- चिनी परराष्ट्र मंत्र्यांनंतर चिनी संरक्षण मंत्रीही “गायब”; शी जिनपिंगांचे वर्चस्व पडतेय ढिल्ले, म्हणून आवळतोय फास!!
- पक्ष रजिस्टर झाला नाही म्हणून फक्त मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत बाजू मांडून बाहेर आलो; संभाजीराजांचा खुलासा
- राजस्थान काँग्रेस आमदाराचे गेहलोत सरकारला खुले आव्हान, म्हणाले ”मला किंवा मुलाला तिकीट दिले तरच…”
- हिंदू धर्म नष्ट करणारे नष्ट होतील, हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही – देवेंद्र फडणवीस