प्रतिनिधी
मुंबई – जर कोळसा टंचाईचा गैरफायदा घेऊन काही कंपन्यांनी आधी ठरवलेल्या किंमतीपेक्षा तिप्पट दराने वीज विकून वितरण कंपन्यांकडून बक्कळ पैसा कमावला असेल तर ते गंभीर आहे. असे असेल तर यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.Disadvantages of coal scarcity Companies sell electricity at triple the rate
मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अनिल शिदोरे यांनी इकॉनॉमिक टाइम्सची एक बातमी शेअर करून काही कंपन्यांची नफाखोरी केल्याचा आरोप केला आहे. हिंदुस्थान पॉवर लिमिटेड, अदानी पॉवर स्टेज २ आणि तिस्ता स्टेज ३ या कंपन्यांनी १८ रूपये युनिट दराने वीज विक्री केल्याचे बातमीत म्हटले आहे.
काही राज्यांच्या वीज वितरण कंपन्या ४ ते ६ रूपये प्रतियुनिटने वीज विकण्याऐवजी १६ ते १८ रूपये प्रतियुनिटने वीज विकत असल्याचे आढळून आल्याचे बातमीत नमूद केले आहे. केंद्रीय ऊर्जा सचिव अलोक कुमार यांनी वीज दरावर लक्ष देण्याची महत्त्वाची सूचना राज्य सरकारांना केल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
ही बातमी अनिल शिदोरे यांनी मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरून शेअर करीत सामान्य ग्राहकाला वीज दरवाढीचा फटका बसल्याकड सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची देखील मागणी केली आहे.
Disadvantages of coal scarcity Companies sell electricity at triple the rate
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने टाकला छापा
- टोपे साहेब अभिनंदन ; फॉर्म भरताना नागपूर मात्र परीक्षेला सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम केंद्र , आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो
- सोशल मीडियावरद्वारे न बोलण्याचे सोनियांचे निर्देश सिद्धूंनी डावलले, 13 मुद्द्यांवर लिहिले पत्र, सोशल मीडियावर केले पोस्ट
- सोलापूरातून किरीट सोमय्यांचे आता थेट पवार कुटुंबीयांना आव्हान; पवार काय प्रत्युत्तर देणार?