वृत्तसंस्था
हैदराबाद : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व प्रादेशिक पक्षांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट लाईन आहे. इकडून चंद्रशेखर राव फोन उचलतात. तिकडून मोदी फोन उचलतात आणि मोदी हे चंद्रशेखर राव यांना थेट आदेश देतात. भाजप आणि त्यांची तेलंगण राष्ट्र समिती एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. Direct line between Modi – Chandrasekhar Rao, Modi gives orders to him
भारत जोडो यात्रेमध्ये हैदराबाद मध्ये घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी भाजप आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले, की भाजप आणि तेलंगण राष्ट्र समिती हातात हात घालून काम करतात. निवडणुका आल्या की एकमेकांविरोधात उभे राहण्याची नाटके करतात. प्रत्यक्षात काँग्रेस विरोधात त्यांचे राजकीय साटेलोटे आहे.
पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात नेहमी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या बाता मारत असत. पण आता अलिकडे ते रोजगाराविषयी बोलेनासे झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पण रोजगाराविषयी आपल्या जाहीर भाषणांमध्ये बोलत नाहीत. उलट तेलंगणाची अर्थव्यवस्था डबघाईला आणून त्यांनी इथल्या युवकांच्या रोजगारावरच कुठाराघात केला आहे, हे ते सांगत नाहीत, असे शरसंधानही राहुल गांधी यांनी साधले आहे.
के चंद्रशेखर राव यांनी नुकतेच आपल्या तेलंगण राष्ट्र समितीचे नामकरण भारतीय राष्ट्र समिती असे केले आहे. त्यांनी एक प्रकारे यातून आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एकाच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चंद्रशेखर राव यांच्यावर राजकीय साटेलोटे केल्याचा आरोप करणे आणि त्यांच्यावर शरसंधान साधणे याला विशेष महत्त्व आहे.
Direct line between Modi – Chandrasekhar Rao, Modi gives orders to him
महत्वाच्या बातम्या