भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कमलनाथ कधीही भाष्य करू शकतात
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर दिग्विजय सिंह यांचे उत्तर आले आहे. ते म्हणाले की, ‘मी काल रात्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली. ते छिंदवाडा येथे स्थायिक आहेत आणि नेहरू-गांधी घराण्यापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारी व्यक्ती आहे.’Digvijay Singhs big statement on talks of Kamal Nath leaving Congress
दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, ‘सुरुवातीपासून दोन्ही कुटुंबांसोबत असलेल्या व्यक्तीकडून सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या कुटुंबांना सोडण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.’
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा खासदार नकुल नाथ यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कमलनाथ कधीही भाष्य करू शकतात, असे मानले जात आहे.
नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेस लिहिलेला लोगो काढून टाकल्याने कमलनाथ आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. त्यातच कमलनाथ यांनी अचानक आपला छिंदवाडा दौरा रद्द करून आपल्या मुलासह दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्या दौऱ्यावरून राज्यात राजकारण तापले आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा खासदार नकुल नाथ यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कमलनाथ कधीही भाष्य करू शकतात, असे मानले जात आहे.
Digvijay Singhs big statement on talks of Kamal Nath leaving Congress
महत्वाच्या बातम्या
- हातात दगड, पण सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी सहमत; लेखी हमी मागितली!!
- दिल्ली – चिपळूण – नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर विरोधक दगड घेऊन रस्त्यावर!!
- मणिपुरात एसपी कार्यालयात तोडफोड; वाहने जाळली, तिरंग्याचा अवमान, दोन जण ठार
- पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…