वृत्तसंस्था
भोपाळ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी विद्यमान नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. शिंदे महाराजांनी गद्दारी केली नसती, तर मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार टिकले असते अशा शब्दांमध्ये दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. ग्वालियर मध्ये येथे एका कार्यक्रमात बोलत होते. Digvijay singh took on jyotiraditya scindia over joining BJP, called him a traitor
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमध्ये राहून सगळे लाभ घेतले. त्यांना काँग्रेसने मंत्रीपदे दिली. खासदार केले. हे सगळे लाभ घेतल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. तिथे आता मंत्री झाले आहेत, पण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की गद्दारी करणाऱ्यांना जनता
कधीच विसरत नाही, असा इशारा देखील दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.
दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्यामुळे कमलनाथ यांच्या राजकीय जखमेवरची खपली निघाली आहे. मध्य प्रदेशातले कमलनाथ सरकार काँग्रेसमधल्या पंधरा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे पडले होते. हे पंधरा आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक होते. त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद हवे होते. परंतु, काँग्रेस नेत्यांनी ते पद दिले नाही त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पासून वेगळी वाट काढत भाजपचा रस्ता धरला.
भाजप मध्ये आल्यानंतर सुमारे वर्षभराने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात स्थान देऊन नागरी हवाई वाहतूक मंत्री केले. या राजकीय पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वैयक्तिक टीका केली आहे. त्याच वेळी त्यांनी कमलनाथ यांच्या राजकीय जखमेवरची खपली देखील काढली आहे.
Digvijay singh took on jyotiraditya scindia over joining BJP, called him a traitor
महत्त्वाच्या बातम्या
- पाण्याच्या बाटलीने घेतला अभियंत्याचा जीव; भरधाव मोटारीच्या ब्रेकखाली आल्याने अपघात
- सुरक्षादलांना मिळणार संपूर्ण देशी ड्रोन विरोधी तंत्रज्ञान, संशयित हालचाली हाणून पाडणे होणार शक्य
- फारुख अब्दुल्लांचे भडकाऊ आवाहन, कृषि कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळविण्यासाठी आंदोलन