• Download App
    दिग्विजय सिंहांची क्लब हाऊस चॅट व्हायरल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा बहाल होणार कलम 370! । Digvijay Singh Promised To A Pakistan Origin Journalist About Restore Article 370 In Kashmir During viral club house chat shared by BJP IT Cell Head Amit Malviya

    दिग्विजय सिंहांची क्लब हाऊस चॅट व्हायरल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा बहाल होणार कलम 370!

    Digvijay Singh : कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा भाजपच्या ते निशाण्यावर आले आहेत. दिग्विजय सिंह यांनी क्लब हाऊसमधील चॅटदरम्यान म्हटले की, कॉंग्रेसची सत्ता आल्यास ते जम्मू-काश्मीरमधील कलम 370 पुन्हा बहाल करण्याचा विचार करतील. या गप्पांमध्ये एक पाकिस्तानी पत्रकारही होता, असा दावा केला जात आहे. Digvijay Singh Promised To A Pakistan Origin Journalist About Restore Article 370 In Kashmir During viral club house chat shared by BJP IT Cell Head Amit Malviya


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा भाजपच्या ते निशाण्यावर आले आहेत. दिग्विजय सिंह यांनी क्लब हाऊसमधील चॅटदरम्यान म्हटले की, कॉंग्रेसची सत्ता आल्यास ते जम्मू-काश्मीरमधील कलम 370 पुन्हा बहाल करण्याचा विचार करतील. या गप्पांमध्ये एक पाकिस्तानी पत्रकारही होता, असा दावा केला जात आहे.

    ‘पाकिस्तानला हेच तर पाहिजे…’

    ट्विटरवर क्लब हाऊस चॅटचा एक भाग शेअर करून भाजप नेते अमित मालवीय यांनी दिग्विजय सिंह यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘क्लबहाऊस चॅटमध्ये राहुल गांधी यांचे सहायक दिग्विजय सिंह यांनी एका पाकिस्तानी पत्रकारास सांगितले की, कॉंग्रेसची सत्ता आल्यास कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करू. प्रत्यक्षात? पाकिस्तानला हेच हवे आहे.’

    पाकिस्तान कॉंग्रेसचे पहिले प्रेम

    क्लब हाऊस चॅट लीक झाल्यानंतर दिग्विजय सिंह भाजप नेत्यांच्या निशाण्याखाली आले आहेत. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्हायरल चॅटला ट्विट करून म्हटले की, ‘पाकिस्तान हे कॉंग्रेसचे पहिले प्रेम आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचा संदेश पाकिस्तानला दिला आहे. काश्मीर हस्तगत करण्यात काँग्रेस पाकिस्तानला मदत करेल.”

    Digvijay Singh Promised To A Pakistan Origin Journalist About Restore Article 370 In Kashmir During viral club house chat shared by BJP IT Cell Head Amit Malviya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य