विशेष प्रतिनिधी
भोपाळ : उज्जैन येथील वाद प्रकरणी जिल्हा न्यायालयाने माजी मुख्यमंत्री खासदार दिग्विजय सिंह आणि प्रेमचंद गुड्डू यांच्यासह सहा आरोपींना प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. Digvijay Singh and six others sentenced to one year
हे प्रकरण 2011 सालचे आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे उज्जैन येथे आगमन होताच त्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या बीजेवायएम कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दिग्विजय सिंग, प्रेमचंद गुड्डू, जयसिंग दरबार, मुकेश भाटी, अस्लम लाला, महेश परमार, अनंत नारायण मीणा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
- ज्योतिरादित्य यांनी गद्दारी केली नसती तर कमलनाथ यांचे सरकार टिकले असते; दिग्विजय सिंग यांचा हल्लाबोल
उज्जैनचे बीजेवायएम नेते जयंत राव यांनी जिवाजीगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप अभाविपचे पदाधिकारी अभय आपटे यांनी केला होता. याप्रकरणी दिग्विजय सिंह शनिवारी इंदूरला पोहोचले आणि जिल्हा न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश मुकेश नाथ यांनी ही शिक्षा सुनावली. मात्र, शिक्षा सुनावल्यानंतरच जामिनाची प्रक्रिया सुरू झाली.
Digvijay Singh and six others sentenced to one year
महत्त्वाच्या बातम्या
- सुप्रियाताई, घोटाळेबाजांनाच छापे आधी “समजतात”!!; पुढच्या आठवड्यात तिघांचे घोटाळे मार्गी लागणार; किरीट सोमय्यांचा टोला
- Somaiya V/S Parab : कोकणात हातोडा राजकीय नाट्य शिगेला, राष्ट्रवादी – शिवसेना घातपात करताहेत, किरीट सोमय्यांचा आरोप
- दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाला ‘रोजगार बजेट’ असे नाव एम्प्लॉयमेंट पोर्टल एक यशस्वी प्रयत्न : सिसोदिया
- GOOD BREAKING NEWS : गरिबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ