• Download App
    ‘Digital Sansad’ सभागृहाच्या कामकाजाच्या रिअल टाइम ट्रान्सक्रिप्शनसाठी करणार ‘AI’ चा वापर! Digital Sansad will use AI for real time transcription of the proceedings of the House

    ‘Digital Sansad’ सभागृहाच्या कामकाजाच्या रिअल टाइम ट्रान्सक्रिप्शनसाठी करणार ‘AI’ चा वापर!

    सध्या देशाच्या हायटेक संसदेबाबत चर्चा चांगलीच रंगलेली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत देशवासीयांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि उत्सुकता आहे. संसद भवनाच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, हायटेक संसदेबाबत चर्चा चांगलीच रंगली आहे. Digital Sansad will use AI for real time transcription of the proceedings of the House

    दरम्यान, नव्या संसद भवनाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक नवीन संसद भवनाचे उद्घाटन ‘डिजिटल संसदे’च्या शुभारंभाच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे. लोकसभा सचिवालयाचा हा पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म केवळ संसद सदस्यांच्या संसदीय नोंदींमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया सुलभ करेल असे नाही तर २२ अनुसूचित प्रादेशिक भाषांमध्ये सभागृहाच्या कामकाजाच्या रिअल टाइम ट्रान्सक्रिप्शनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)आधारित तंत्रज्ञानाचा वापर करेल.

    ‘स्पीच टू टेक्स्ट’मुळे  झटपट आणि अचूक भाषांतर होणार –

    नवीन संसदेत  एआय आधारित ‘स्पीच टू टेक्स्ट’ भाषांतर इंजिन संसदीय कामकाजादरम्यान रिअल टाइममध्ये भाषांतरित करेल. सध्या संसद सचिवालयाच्या रिपोर्टिंग शाखेमार्फत त्याचा उतारा तयार केला जातो. पण एआयमुळे आता सभागृहाच्या कामकाजाचे अचूक भाषांतर एकाच वेळी होणार आहे.

    उद्देश काय? –

    पोर्टलच्या ‘नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम’द्वारे संसद सदस्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ‘वन नेशन, वन अॅप्लिकेशन’ व्यासपीठ आहे. यामुळे संसदेच्या संसाधनांपर्यंत खासदारांचा जलद प्रवेश वाढेल. तर सचिवालय ऑनलाइन माहिती प्रसारित करण्यास सक्षम असेल. हे पोर्टल मंत्रालये आणि संसद यांच्यातील एंड-टू-एंड डिजिटल संभाषण सुलभ करेल आणि नागरिकांसाठी संसदीय कामकाज आणि इतर संबंधित माहिती सहज उपलब्ध करून देईल.

    Digital Sansad will use AI for real time transcription of the proceedings of the House

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!