• Download App
    दोन मुख्यमंत्र्यांतील फरक , नवीन पटनाईक म्हणतात देश संकटात मदत नको, आम्ही आमच्या ताकदीवर लढतो अन् ममतांनी मागितले २० हजार कोटी रुपये|Differences between two Chief Ministers, Naveen Patnaik says the does not need help in crisis, we are fighting on our own strength, Mamata demanded Rs 20,000 crore

    दोन मुख्यमंत्र्यांतील फरक , नवीन पटनाईक म्हणतात देश संकटात मदत नको, आम्ही आमच्या ताकदीवर लढतो अन् ममतांनी मागितले २० हजार कोटी रुपये

    पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसला. पण सुसंस्कृत देशप्रेमी आणि थयथयाट करणाºया दोन मुख्यमंत्र्यांमधील फरक देशासमोर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत सहभागी होऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक म्हणाले की देशासमोर कोरोनाचे संकट असल्याने केंद्राला त्याच्याशी लढायचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या बळावरच लोकांना मदत करतो. तर उशिरा बैठकीत पोहोचून ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांचा अपमान केलाच पण केंद्राकडून २० हजार कोटी रुपयांची मदतही मागितली.Differences between two Chief Ministers, Naveen Patnaik says the does not need help in crisis, we are fighting on our own strength, Mamata demanded Rs 20,000 crore


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसला. पण सुसंस्कृत देशप्रेमी आणि थयथयाट करणाऱ्या अशा दोन मुख्यमंत्र्यांमधील फरक देशासमोर आला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत सहभागी होऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक म्हणाले की देशासमोर कोरोनाचे संकट असल्याने केंद्राला त्याच्याशी लढायचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या बळावरच लोकांना मदत करतो.



     

    तर उशिरा बैठकीत पोहोचून ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांचा अपमान केलाच पण केंद्राकडून २० हजार कोटी रुपयांची मदतही मागितली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनाईक यांच्याकडून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

    ओडिशातील झालेल्या नुकसानामुळे मदत म्हणून काय पाहिजे हे विचारले. त्यावर पटनाईक म्हणाले, काहीही नाही. कारण सध्या देशात कोरोनाच्या महामारीमुळे केंद्राची संपूर्ण यंत्रणा त्याविरुध्द लढत आहे.

    त्यामुळे आम्ही केंद्रावर आणखी ओझे टाकू इच्छित नाही. आमच्या राज्यातील साधनांचा वापर करूनच जनतेची मदत करू.पटनाईक यांनी पंतप्रधानांकडे पायाभूत सुविधा मजबूत करण्याची मागणी केली.

    ते म्हणाले, समुद्राच्या किनाºयावरील तटबंदी अशा पध्दतीने तयार करायला हवी की भविष्यातील कोणत्याही नैसर्गिक संकटात नुकसान व्हायला नको.
    ममता बॅनर्जी यांनी बैठकीत पंतप्रधानांचा अपमान तर केलाच. त्यांना नुकसानीची माहितीही व्यवस्थित दिली नाही. उलट २० हजार कोटी रुपयांची मदत मागितली. दीघा आणि सुंदरबन भागासाठी प्रत्येकी १० हजार कोटी रुपयांची मदत त्यांनी मागितली.

    Differences between two Chief Ministers, Naveen Patnaik says the does not need help in crisis, we are fighting on our own strength, Mamata demanded Rs 20,000 crore

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!

    Kulbhushan Jadhav : कुलभूषण पाकिस्तानातील हायकोर्टात करू शकणार नाहीत अपील; फक्त कॉन्सुलर सहाय्य प्रदान केले