विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेकडो कोटींच्या नोटा कपाट आणि कपाटं आणि खोक्यात दाबून ठेवणाऱ्या धीरज साहूचे “हे” जुने वाचा आणि डोक्यावर “हात” मारून घ्या!!, असे म्हणायची वेळ त्या ट्विट मधल्या भाषेने देशातल्या सर्वसामान्य जनतेवर आणली आहे.Dhiraj parsad sahu’s old twitte irked public, as voiced against corruption after demonetisation
ओडिशातला काँग्रेसचा राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू याच्या कंपनीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातल्यानंतर जे नोटांचे प्रचंड घबाड हाताला लागले, त्यामुळे शेकडो कोटींच्या नोटा पाहायची सहज सवय असलेल्या अधिकाऱ्यांचेच डोळे विस्फारले. डिपार्टमेंटने एकाच वेळेला 40 अधिकारी कामाला लावले. त्यांच्याबरोबर 100 कर्मचारी दिले. 10 मशीन्स नोटा मोजायला लावली. त्यातली काही मशीन्स नोटा मोजताना बंद पडली. पण धीरज प्रसाद साहुने कपाटं आणि खोकी, पेट्या, बॅगांमध्ये भरलेल्या नोटा मोजून संपल्याच नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणाहून अजून नोटा सापडायला लागल्या. ही रक्कम आता 300 कोटींच्या वर गेली आहे, तरीही अजून वेगवेगळ्या ठिकाणी सांदी कोपऱ्यांमध्ये कपाटं, खोक्यांमध्ये नोटा सापडतच आहेत. अधिकाऱ्यांनी आता शिफ्ट नुसार कामाला सुरुवात केली आहे.
इतकं सगळं घबाड धीरज प्रसाद साहू नेमकं कधी, कुठे आणि कसं गोळा करत होता??, याचा मेळ बसवण्याच्या कामाला अधिकारी लागले आहेत, पण अजून त्याचे धागेदोरे सापडलेले नाहीत. असे असताना हा धीरज कुमार साहू मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवर मात्र चिडला होता. त्याने त्याचा संताप त्यावेळी ट्विटरवरून व्यक्त केला होता.
त्या ट्विटमध्ये धीरज प्रसाद साहू म्हणतो
नोटबंदी नंतरही देशात एवढे काळे धन आणि भ्रष्टाचार पाहून माझे मन व्यथित होते. मला तर हे समजतच नाही की, लोक एवढि काळा पैसा कुठून जमा करतात?? या देशातल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे जर कोणी उखडून फेकू शकणार असेल, तर तो फक्त काँग्रेस पक्षाचा आहे!!
धीरज प्रसाद साहूची ही ट्विट मधली ही भाषा इतकी साळसूद आणि संभावित आहे की, त्याच्यासारखा नेता शेकडो कोटींची मालमत्ता कपाटं आणि खोक्यांमध्ये भरून ती दडपून ठेवू शकेल, असे स्वप्नातही कुणाला वाटले नसेल. पण धीरज कुमार साहूने दडपून ठेवलेल्या शेकडो कोटींच्या नोटा आता बाहेर आल्या आहेत. आणखी किती नोटा बाहेर येतील??, याची अद्याप तरी कोणाला नेमकी माहिती नाही.
पण त्यामुळेच वर उल्लेख केल्याप्रमाणे शेकडो कोटींच्या नोटा कपाटं आणि खोक्यात दडपलेल्या बघून आणि त्या आधीचे धीरज प्रसाद साहूचे ट्विट बघून देशातल्या सामान्य जनतेला आपणच आपल्याच डोक्यावर “हात” मारून घेतल्याचा अनुभव आला आहे!!
Dhiraj parsad sahu’s old twitte irked public, as voiced against corruption after demonetisation
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंची नेत्यांना पायाखाली तुडवण्याची भाषा; फडणवीसांना उघडे पाडण्याचा दिला इशारा!!
- कँटीनची नोकरीही सोडली, वाटेत भेटणाऱ्या लोकांना अयोध्येला येण्याचे देत आहे निमंत्रण
- 3 दिवसांत 300 कोटी, अद्यापही नोटांची मोजणी सुरूच; काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या आवारात सापडला कुबेराचा खजिना
- दिल्लीच्या ‘VVIP’ वसंत कुंज परिसरात चकमक, लॉरेन्स गँगच्या दोन शूटर्सला अटक