• Download App
    DHFL Scam : 34000 कोटींच्या बँक घोटाळ्यात धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक Dheeraj Wadhawan arrested by CBI in 34000 crores bank scam

    DHFL Scam : 34000 कोटींच्या बँक घोटाळ्यात धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : 34000 कोटींच्या बँक घोटाळ्यात DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला सीबीआयने अटक केली आहे. या अटकेनंतर त्यांना आज दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. Dheeraj Wadhawan arrested by CBI in 34000 crores bank scam

    सीबीआय अधिकाऱ्यांनी धीरज वाधवानला सोमवारी सायंकाळी मुंबईतून ताब्यात घेऊन दिल्लीतील आणून विशेष न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याप्रकरणी सीबीआयने 2022 मध्येच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. महत्त्वाचे म्हणजे येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी धीरजला यापूर्वीही अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या तो जामीनावर बाहेर होता.


    DHFL Case : राणा कपूर यांच्या पत्नी आणि दोन मुलींची जामीन याचिका फेटाळली, विशेष सीबीआय न्यायालयाने 23 सप्टेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी


    धीरज वाधवान आणि त्याच्या परिवाराने एकूण 17 बँकांची 34000 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी 2010 ते 2018 दरम्यान डीएचएफएलला 42781 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी मिळून हेराफेरी केली आणि मे 2019 पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून 34615 कोटी रुपयांची फसवणूक केली, असे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

    Dheeraj Wadhawan arrested by CBI in 34000 crores bank scam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bengaluru : बंगळुरूत जोडप्याने फूड डिलिव्हरी एजंटला चिरडले; स्कूटर कारला खेटून गेल्याने 2 किमी पाठलाग करून धडक

    Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी म्हणाली- दाऊद दहशतवादी नाही, मुंबई बॉम्बस्फोट त्याने घडवून आणले नाहीत, मी त्याला कधीच भेटले नाही

    Gujarat : गुजरातेत गर्भपातावर सुनावणी सुरू असताना अल्पवयीन पीडिता प्रसूत; 15 वर्षीय रेप पीडितेचा खटला; राज्याला 6 महिन्यांचा खर्च उचलण्याचे आदेश