• Download App
    धाराशिव उपसा सिंचन योजना 2024 पर्यंत पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा|Dharashiv Upsa Irrigation Scheme to be completed by 2024, Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced

    धाराशिव उपसा सिंचन योजना 2024 पर्यंत पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    धाराशिव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 16) दुपारी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे विकास तीर्थ कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. पांगदरवाडी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांचा सत्कार केला. या प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेतील कामे जून 2024 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी यंत्र पूजन केले.Dharashiv Upsa Irrigation Scheme to be completed by 2024, Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced

    या प्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रवीण दरेकर, संभाजी पाटील-निलंगेकर, सुरेश धस, अभिमन्यू पवार, राजेंद्र राऊत आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी सोबत होते.



    मराठवाड्याची तहान भागवण्याच्या दृष्टीने कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र 2005 पासून या प्रकल्पाची केवळ चर्चाच चालू होती. अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना 2019 मध्ये हा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर मध्यंतरीच्या सरकारच्या काळात हा प्रकल्प अडीच वर्षे रखडला.

    मात्र, भाजपा-शिवसेना सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा यात लक्ष घातले. डिसेंबर 2022 मध्ये या प्रकल्पाला तब्बल 11726.19 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

    प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी तत्काळ निविदा काढून उपसा सिंचन योजना क्रमांक 1 व 2 ची उर्वरित कामेही सुरू करण्यात आली आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव या तालुक्यातील 36 गावांना तर तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील 55 गावांना पाणी मिळणार आहे. एकूण 91 गावातील 25 हजार 798 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

    सन 2023-24 या आर्थिक वर्षात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या धाराशिव जिल्ह्यातील योजनांसाठी 559.75 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

    Dharashiv Upsa Irrigation Scheme to be completed by 2024, Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे