या विधेयकाने इतिहास रचला जात असल्याचे धामी म्हणाले..
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सादर केलेले ‘समान नागरी संहिता उत्तराखंड 2024 विधेयक’ बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. विधानसभेत UCC विधेयक मंजूर झाल्यानंतर, उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करेल आणि असे करणारे देशातील पहिले राज्य बनेल. Dhami governments Uniform Civil Code Bill approved in Uttarakhand Legislative Assembly
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की UCC हे सामान्य विधेयक नाही. हे एक स्वप्न आहे जे प्रत्यक्षात येणार आहे आणि त्याची सुरुवात उत्तराखंडपासून होणार आहे. यूसीसी विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी उत्तराखंडच्या जनतेचे अभिनंदन केले. या विधेयकाने इतिहास रचला जात असल्याचे ते म्हणाले. हे भारतातील इतर राज्यांसाठी एक आदर्श ठेवेल, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसीवर आपले मत मांडल्याबद्दल विरोधी पक्षांसह सर्व विधानसभा सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच एवढी मोठी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यूसीसी वर आपले विचार ठेवण्यासाठी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना धन्यवाद दिले.
Dhami governments Uniform Civil Code Bill approved in Uttarakhand Legislative Assembly
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी म्हणाले, ममताजी अजूनही इंडिया आघाडीचा भाग; जागावाटपाची चर्चा सुरू
- अख्खा शरद पवार गट दाखवतोय संघर्षातून भविष्याची आशा; पण एकटेच आव्हाड बोलताहेत 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या राजकीय हत्येची भाषा!!
- विनायकराव थोरातांसारखे सेवाव्रती कार्यकर्ते तयार करणे ही संघाची उपलब्धी : भैय्याजी जोशी
- पवारांच्या नव्या पक्षाला “मनुष्यबळाचा इंधनपुरवठा” जरांगे पाटलांच्या टीम मधून??