• Download App
    तिरुपती देवस्थानाकडे पाचशे, हजारांच्या नोटांच्या स्वरुपात ५० कोटी रुपये, नोटाबंदीनंतरही भाविकांनी जुन्या नोटांच्या स्वरुपात केले दान|Devotees donate Rs. 50 crore in the form of 500, 1000 notes to Tirupati Devasthanam, even after denomination

    तिरुपती देवस्थानाकडे पाचशे, हजारांच्या नोटांच्या स्वरुपात ५० कोटी रुपये, नोटाबंदीनंतरही भाविकांनी जुन्या नोटांच्या स्वरुपात केले दान

    तिरुमुला तिरुपती देवस्थानाकडे तब्बल ५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा असल्याचे उघड झाले आहे. देवस्थान ही रक्कम बॅँकेत भरण्याच्या तयारीत आहे. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोटा बदलून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.Devotees donate Rs. 50 crore in the form of 500, 1000 notes to Tirupati Devasthanam, even after denomination


    तिरुपती : तिरुमुला तिरुपती देवस्थानाकडे तब्बल ५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा असल्याचे उघड झाले आहे. देवस्थान ही रक्कम बॅँकेत भरण्याच्या तयारीत आहे. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोटा बदलून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

    तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी सांगितले की केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना यासंदर्भात चार वेळा भेटलो आहे.



    मात्र, त्यांनी काहीही मदत करण्यास नकार दिला. कारण केवळ तिरुपती देवस्थानाचा अपवाद केला तर इतर संस्थांवर अन्याय होईल. उद्या या संस्थाही नोटा बदलून घेण्यास पुढे येतील.सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.

    मात्र, त्यानंतरही तिरुपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून दानपेटीमध्ये जुन्या बाद झालेल्या नोटा जमा होत आहेत. नोटाबंदीनंतर तिरुपती देवस्थानाकडे हजार रुपयांच्या बाद झालेल्या १.८ लाख नोटा जमा झाल्या आहेत.

    त्यांचे मूल्य १८ कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पाचशे रुपयांच्या ६.३४ लाख नोटा दान करण्यात आल्या आहेत. त्याचे मूल्य ३१.७ कोटी रुपये आहे. भाविकांनी नोटाबंदीपासून आत्तापर्यंत सुमारे पन्नास कोटी रुपयांचे जुन्या नोटांच्या स्वरुपात दान केले आहे.

    या नोटा नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, तिरुपती देवस्थानच्या भावना त्यामध्ये जोडल्या आहेत. ही रक्कम धर्मार्थ म्हणून भाविकांनी जमा केली आहे. त्यामुळे या नोटा नष्ट करणे योग्य वाटत नसल्याचे सुब्बा रेड्डी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, या नोटांचे काय करावे हे आम्हाला समजेनासे झाले आहे.

    आम्ही या संदर्भात रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाशीही संपर्क साधला आहे. या नोटांचे काय करावे याबाबत त्यांचे मार्गदर्शन मागितले आहे. हे सगळे भाविकांचे पैसे आहेत. त्यामुळे आम्ही या नोटा आमच्या पातळीवर नष्ट करू शकत नाही.

    Devotees donate Rs. 50 crore in the form of 500, 1000 notes to Tirupati Devasthanam, even after denomination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे