विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली.
यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
Devendra Fadnavis meet the PM Narendra Modi Ji in New Delhi.
महत्वाच्या बातम्या
- Sabha : लोकसभेत इमिग्रेशनवर नवे विधेयक सादर; माहिती न देता विदेशी व्यक्तीला आणल्यास 3 वर्षे शिक्षेची तरतूद
- केंद्र सरकारची मोठी कारवाई ; जेकेआयएम अन् एएसी संघटन बेकायदेशीर घोषित!
- बियर शॉपी, दारु दुकानांसाठी आता राज्य सरकारची नवी अट
- Devendra Fadnavis ‘’नियमभंग करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई अटळ’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट