• Download App
    हमासला इस्लामिक स्टेट ISIS सारखे नष्ट करू; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत इस्रायली पंतप्रधानांची ग्वाही Destroy Hamas like Islamic State ISIS

    हमासला इस्लामिक स्टेट ISIS सारखे नष्ट करू; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत इस्रायली पंतप्रधानांची ग्वाही

    वृत्तसंस्था

    तेल अविव : हमास दहशतवादी संघटनेशी इस्रायणी “ऑल आउट वॉर” पुकारल्यानंतर अमेरिकेची लष्करी कुमक इस्रायलमध्ये पोहोचलीच, पण त्या पाठोपाठ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन हे देखील इस्रायलमध्ये दाखल झाले. त्यांनी ताबडतोब इस्रायली राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेतली. त्यावेळी इस्रायली पंतप्रधानांनी हमास दहशतवादी संघटनेला इस्लामिक स्टेट ISIS सारखे नष्ट करून टाकू, अशी ग्वाही दिली. Destroy Hamas like Islamic State ISIS

    हमास दहशतवादी संघटनेचा इस्रायल वरील हल्ला ही इस्रायल साठी इष्टापत्तीत बदलण्याची संधी त्या देशाने घेतली असून त्यानिमित्ताने संपूर्ण गाझापट्टीचा नकाशाच बदलण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे. गाझापट्टीचा नकाशा बदलला की त्या विभागावरचे अरबी वर्चस्व पूर्णपणे नष्ट करून इस्रायलचे संपूर्ण वर्चस्व निर्माण करण्याचा त्या देशाचा इरादा आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांसमोर बोलताना इस्रायली पंतप्रधानांनी उघडपणे हा इरादा व्यक्त केला.

    रशिया – युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोप यांनी युक्रेंची बाजू उचलून धरली होती, तरी रशियाने आक्रमण केल्यानंतर पहिला साधारण महिनाभर तरी युरोप किंवा अमेरिकेतले कोणीही बडे नेते युक्रेनमध्ये गेले नव्हते. पण हमास दहशतवादी संघटनेच्या विरोधातील इस्रायलच्या युद्धाला फक्त पाच दिवस झाल्यानंतर सहाव्याच दिवशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तातडीने इस्रायलचा दौरा केला आहे. अमेरिकन स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे.

    इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान शांतता करार अमलात येण्याच्या काहीच दिवस अगोदर हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायल – सौदी करार रोखण्याचा इराणचा इरादा त्यामुळे उघड झाला. इराणनेच हमासलाची चिथावणी देऊन इस्रायलवर हल्ला करायला लावला, पण आता इराण हमासच्या पाठीशी उघडपणे उभे राहण्याऐवजी विशिष्ट अंतर ठेवून हमास – इस्रायल युद्धाकडे पाहत आहे. त्यामुळे हमास अरब देशांमध्ये देखील एकाकी पडल्याचे चित्र आहे.

    या पार्श्वभूमीवर इस्रायलने हमासच्या अड्डयांवरचे हल्ले हल्ले वेगवान केले असून हमासचे जास्तीत जास्त अड्डे कमीत कमी दिवसात उद्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा इरादा आहे आणि त्यासाठी अमेरिकन शस्त्र आस्त्रांचे बळ इस्रायलला मिळाले आहे.

    Destroy Hamas like Islamic State ISIS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!