• Download App
    राम मंदिर ही दिव्य स्वप्नाची पूर्ती; लालकृष्ण अडवाणींच्या भावनाDestiny decided construction of Ram temple, chose PM Modi for this

    राम मंदिराच्या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी नियतीने मोदींना निवडले… राम मंदिर आंदोलनाचे मूळ शिलेदार अडवाणींच्या भावना

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहणे आणि त्यामध्ये श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणे, ही दिव्य स्वप्नाची पूर्ती आहे.. आणि त्यासाठी नियतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड केली आहे, अशा शब्दांत राम रथयात्रेचे प्रवर्तक आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
    Destiny decided construction of Ram temple, chose PM Modi for this

    अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकांना लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेची आठवण आली. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण राम मंदिर उभे राहण्यासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी आपण हजर राहणार असल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान आता लालकृष्ण अडवाणी यांच्या भावना समोर आल्या आहेत.



    राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेवर लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत की, अयोध्येत राम मंदिर होणार हे नियतीने आधीच ठरवले होते. लालकृष्ण अडवाणी यांनी हा क्षण आणण्यासाठी, रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी आणि त्यांचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

    ‘श्रीराममंदिर: एक स्वप्नपूर्ती’

    वैचारिक विषयांवरील मासिकाशी संवाद साधताना लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘श्री राम मंदिर : एक दिव्य स्वप्नाची पूर्तता’ या लेखात त्यांनी या भावना केल्या आहेत. हा विशेषांक 15 जानेवारीला प्रकाशित होत आहे. आपल्या रथयात्रेतील अविस्मरणीय क्षणांचे स्मरण करत अडवाणी म्हणाले की, रथयात्रेला आज जवळपास 33 वर्षं झाली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रेला सुरुवात करताना आम्हाला माहिती नव्हतं की, प्रभू श्रीरामावरील ज्या आस्थेपासून प्रेरित होत आम्ही जी यात्रा सुरु करत आहोत ती एके दिवशी आंदोलनाचं रुप घेईल.

    श्री रामलल्लाचे मंदिर उभारण्याचा ठाम संकल्प घेऊन 33 वर्षांपूर्वी देशातील 10 राज्यांमध्ये अडवाणींनी रथयात्रा काढली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या प्रवासात अडवाणींचे सर्वात विश्वासू सहकारी होते हादेखील एक योगायोगच आहे .आता ते मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार होतील. अयोध्येतील राम मंदिराचा संकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. अडवाणींच्या रथयात्रेने संपूर्ण देशातील रामभक्तांची श्रद्धा जागृत करण्याचे काम केले होते.

    लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारीला राहणार हजर

    विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या  कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे. अडवाणींच्या अयोध्या दौऱ्यात त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्था पुरवल्या जातील, असंही सांगण्यात आलं आहे. आलोक कुमार यांनी संघाचे नेते कृष्ण गोपाल यांच्यासह अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होते.

    Destiny decided construction of Ram temple, chose PM Modi for this

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!