लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी इतिहास रचला जाईल, असंही ते म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेसने दुहेरी आणि निवडक वृत्ती स्वीकारल्याचा आरोप केला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममधून काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे चंद्रशेखर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी इतिहास रचला जाईल, असा दावाही केला. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असून यावेळी दक्षिण भारतातून जवळपास 60 जागा मिळतील, असे ते म्हणाले.despite this BJPs seats will increase in the south Statement of Rajiv Chandrasekhar
काँग्रेसच्या निवडणूक प्रचारशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीव चंद्र शेखर म्हणाले, “दक्षिण भारतात भाजप 60 जागा जिंकेल. भाजपला सध्या 39 जागा आहेत. काँग्रेसचा निवडणूक प्रचार खोटारडेपणा, खोटे व्हिडिओ आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे.” कर्नाटक, केरळ आणि तेलंगणामध्ये या लोकांनी आम्ही राज्यघटना बदलू, असे खोटे पसरवले आहे, पण असे काहीही होणार नाही. असंही चंद्रशेखर म्हणाले.
ते म्हणाले, “लूटमार आणि खोटे बोलणे ही काँग्रेसची ओळख बनली आहे. काँग्रेसने जास्तीत जास्त घटनादुरुस्ती करून आमच्यावर आरोप केले आहेत. व्हिडीओशी छेडछाड करून खोटे पसरवणे ही काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी कडून आरक्षण घेऊन मुस्लिमांना देत आहे, ज हे संविधानाच्या विरोधात आहे.
despite this BJPs seats will increase in the south Statement of Rajiv Chandrasekhar
महत्वाच्या बातम्या
- “भटकता आत्मा” हे महाराष्ट्रापुरते का होईना, पण “पप्पू” सारखेच मोठे प्रतिमा भंजन!!
- मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये गोळीबार; 12 जणांनी केली शूटिंग, मोर्टार डागले
- भटकता आत्मा आणि महाराष्ट्रातील अस्थिरता यांचा संबंध जोडून मोदींनी विधानसभा निवडणुकीचाही टोन केला सेट!!
- भटकत्या आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर केला आता देश अस्थिर करायला निघालाय; पुण्यातून मोदींचा शरद पवारांवर जबरदस्त प्रहार!!