• Download App
    बंदी असूनही नव्या अवतारातील चीनी अ‍ॅप्सचा वापर वाढतोय|Despite the ban, the use of new incarnations of Chinese apps is on the rise

    बंदी असूनही नव्या अवतारातील चीनी अ‍ॅप्सचा वापर वाढतोय

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताविरुध्द सातत्याने कुरापती काढणाºया चीनला धडा शिकविण्यासाठी गेल्या वर्षी चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यातील बहुतांश अ‍ॅप्स नव्या अवतारात भारतात आली आहे. त्यांचा वापरही वाढत आहे.Despite the ban, the use of new incarnations of Chinese apps is on the rise

    सीमेवरील चीनच्या आगळिकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या डाटाचे संरक्षण करण्याबरोबरच देशाच्या सुरक्षिततेसाठी चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. टिकटॉक, यूसी ब्राउझर, पीयूबीजी, हेलो, अलीएक्सप्रेस, लाइक, शेअरिट, एमआय कम्युनिटी, वीचॅट आणि कॅमस्कॅनर, बायडू सर्च, वीबो, बिगो लाईव्ह या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.



    इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या अ‍ॅप्सवर बंदी घातलीहोती. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे, सरकार नागरिकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व आघाड्यांवर भारताची सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठीही बंदी घालण्यात आली असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.

    मात्र, गेल्या वर्षभरात नवीन अवतारात ही अ‍ॅप्स भारतात दाखल झाली आहेत. त्यांनी आपले चीनी मूळ लपविण्यासाठी नवीन कंपनीचे नाव धारण केले आहे. मात्र, त्यांच्या भारतातील प्रवेशाकडे दूर्लक्ष करण्यात आले आहे. ही अ‍ॅप्स नवीन कंपनीच्या नावांसह लॉँच करण्यात आली आहेत. त्यांच्या मालकीबद्दलही माहितीही संभ्रमात टाकणारी आहे. यातील बहुतांश अ‍ॅप्स ही मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत.

    Despite the ban, the use of new incarnations of Chinese apps is on the rise

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली