वैष्णवी ढेरे
कर्नाटक मध्ये हिजाब वाद हा परत उफाळून आला आहे. हिजाबचे समर्थन करणाऱ्या मुसलमानांनी आमच्या विद्यार्थिनी हिजाब घालूनच परीक्षा देणार. असाच हट्ट धरला आहे. तर मग इतर धर्मांनी देखील आपल्या आपापल्या धार्मिक गोष्टी धारण करून परीक्षा देण्याचा आग्रह धरण्यात काय वाईट आहे? Despite High Court’s decision, Muslims insist on hijab in Karnataka; So should the rest of us continue our religious stubbornness??
मुद्दा कोणत्याही धर्माचा नाही किंवा कोणत्याही धर्माच्या धार्मिक गोष्टींचा नाहीये. मूळमुद्दा शिस्तीचा आणि नियमांचा आहे. हीच गोष्ट लागू करत कर्नाटक राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थिनींना प्रि युनिव्हर्सिटी परीक्षा PUC देण्यास मनाई केली आहे. मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी पूर्ण युनिफॉर्म घालूनच परीक्षा दिली पाहिजे. परीक्षा गुरुवार 9 मार्च 2023 ला सुरू होणार आहे. कर्नाटक हाय कोर्टाने हिजाबवर प्रतिबंध लावले. त्यानंतर परीक्षा देणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींची संख्या वाढताना दिसत आहे. मागच्या वर्षी सारखीच याही वर्षी मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब न घालता देखील परीक्षा देऊ इच्छेतात. परीक्षा देणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीची संख्या वृद्धिंगत होत चालली आहे. असे म्हंटले आहे.
कर्नाटक हायकोर्टाने विद्यार्थिनी हिसाब घालून परीक्षा देऊ शकणार नाही असा निकाल सुनावला होता. पण काही हिजाबच्या समर्थकांनी सुप्रीम कोर्टाचा रस्ता पकडला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी तत्काल या सुनावणीसाठी स्टे दिला आहे. त्यानंतर कर्नाटकातील शाळांनी हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षा देण्यास मनाई केली आहे.
पण मूळ मुद्दा पुन्हा तोच उरतो. हे धार्मिकलोक सोसायटीने आखलेले काही ग्राउंड रुल्स धार्मिक गोष्टींसाठी मोडत इतरांची गैरसोय करत असतील तर याला धर्म म्हणावे का? हिजाब हा इस्लामिक विश्वासाचा महत्त्वाचा भाग पण नाही. पण निव्वळ स्वतःचा धार्मिक इगो मसाज करण्यासाठी आणि आम्ही आमच्या धर्माशी किती संलग्न आहोत. हे उगाचच एस्टॅब्लिश करण्यासाठी हा उथळपणा करायचा.
प्रत्येकाचा एक पिंड आहे. धर्म आहे. आणि तो प्रत्येकाने आपापल्या परीने जपावाच. आणि तसं पाहायला गेलं तर धर्म ही एक भावना आहे. प्रत्येकाने ती आपापल्या परीने जपत वृद्धिंगत करावी. पण भावना जपण्यासाठी इतरांना देखील त्रास होणार असेल तर याला कृतघ्न म्हणू नये का?
Despite High Court’s decision, Muslims insist on hijab in Karnataka; So should the rest of us continue our religious stubbornness??
महत्वाच्या बातम्या
- धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले
- ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष
- भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदाv