वृत्तसंस्था
बंगळुरू : बेंगळुरूमधील खाण आणि भूविज्ञान विभागाच्या उपसंचालक प्रतिमा (43) यांची 4 नोव्हेंबर रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिमा यांचा मृतदेह 5 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी आढळून आला होता.Deputy Director Woman Geologist Killed in Bangalore; A senior official said – they had recently conducted raids at some places
प्रतिमा यांचे वरिष्ठ अधिकारी दिनेश सांगतात की, त्यांनी अलीकडेच काही ठिकाणी छापे टाकले होते. त्या खूप सक्रिय आणि धाडसी महिला अधिकारी होत्या. छापे असोत वा कोणतीही कारवाई, त्यांनी विभागात मोठे नाव कमावले होते. प्रतिमा यांना कोणीही शत्रू नव्हता, त्या आपल्या कामात नियम पाळत असत, त्यामुळेच विभागातील सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
पोलिसांनी रविवारी (5 नोव्हेंबर) सांगितले की, प्रतिमा गेल्या चार-पाच वर्षांपासून येथे एकट्याच राहत होत्या. त्यांचा पती आणि मुलगा शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली गावात राहतात. प्रतिमा शनिवारी (4 नोव्हेंबर) रात्रीपासून कोणाचाही फोन उचलत नव्हत्या. यानंतर प्रतिमा यांचा भाऊ आज सकाळी त्यांच्या घरी पोहोचला. प्रतिमा यांचा मृतदेह तिथेच पडून होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. म्हैसूरमध्ये सीएम सिद्धरामय्या म्हणाले – प्रतिमा यांच्या हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. आम्ही त्याची चौकशी करत आहोत.
बंगळुरू शहराच्या दक्षिण विभागाचे डीसीपी राहुल कुमार यांनी सांगितले की, प्रतिमा गेल्या चार वर्षांपासून बेंगळुरूमध्ये काम करत होत्या. त्या रोज रात्री 8 वाजता ऑफिसमधून घरी यायच्या. शनिवारी, 4 नोव्हेंबर रोजी प्रतिमा यांच्या ड्रायव्हरने त्यांना रात्री 8च्या सुमारास घरी सोडले.
पोलिसांनी सांगितले- गळा दाबून आणि कापल्यामुळे प्रतिमांचा मृत्यू झाला
बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिमा घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे रात्री 8.30 च्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली. गळा दाबून व कापल्याने प्रतिमा यांचा मृत्यू झाला. दरोड्यादरम्यान खून झाल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे.
डीसीपी म्हणाले की, घरातून कोणतेही दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेलेल्या नाहीत. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकही घटनास्थळी पोहोचले. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलीस अधिकारी राहुल कुमार शाहपूरवाड म्हणाले की, फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथके त्यांचे काम करत आहेत. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. एकदा आम्हाला नक्की काय झाले हे कळल्यानंतर आम्ही पुढील तपशील शेअर करू.
Deputy Director Woman Geologist Killed in Bangalore; A senior official said – they had recently conducted raids at some places
महत्वाच्या बातम्या
- निवडणुकांच्या 5 राज्यांमध्ये अवघ्या महिनाभरात तब्बल “एवढ्या” कोटींची मालमत्ता जप्त; वाचा आकडा!!
- महादेव बेटिंग ॲपसह 22 बेटिंग ॲप्लिकेशनवर केंद्राने घातली बंदी
- World Cup Cricket 2023 : भारतीय गोलंदाज ऑन फायर; श्रीलंकेपाठोपाठ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा कचरा!!
- प्रदूषण समस्येच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ; सर्व प्राथमिक शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंद!