• Download App
    मध्य प्रदेशात डेंगीने हाहाकार, मानवी हक्क आयोगानेही घेतली दखल । Dengu casaes risened in Mp

    मध्य प्रदेशात डेंगीने हाहाकार, मानवी हक्क आयोगानेही घेतली दखल

    वृत्तसंस्था

    भोपाळ : मध्य प्रदेशात ह्यावर्षी जानेवारीपासून डेंग्युच्या चोवीसशे रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ९५ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. Dengu casaes risened in Mp

    रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची टक्केवारी २० इतकी आहे. सर्वाधिक संसर्ग मंदसौर जिल्ह्यात असून तेथे ८०० रुग्णांची नोंद झाली. त्यातील दिडशे जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याखालोखाल जबलपूरमध्ये ३२५ रुग्णांची नोंद झाली. भोपाळ, इंदूर, आदी ठिकाणीही हे रुग्ण आढळले आहेत.



    जबलपूर महापालिकेने घरांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डासांच्या आळ्या सापडणाऱ्या ठिकाणी घरमालकांना दोनशे रुपये दंड ठोठावला जात आहे.

    मानवी हक्क आयोगाच्या मध्य प्रदेश शाखेने डेंग्युच्या साथीची दखल घेतली आहे. डेंग्युविरुद्ध राज्य सरकारने काय पावले टाकली याची माहिती द्यावी असे राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्यसेवा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना सांगण्यात आले आहे.

    Dengu casaes risened in Mp

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!