• Download App
    Demolition पाकिस्तानने 54 वर्षांनंतर काढली खुन्नस; बांगलादेशी निर्मिती प्रमुखांची सगळी घरे आणि स्मारके केली उद्ध्वस्त!!

    Dhanmondi 32 : पाकिस्तानने 54 वर्षांनंतर काढली खुन्नस; बांगलादेशी निर्मिती प्रमुखांची सगळी घरे आणि स्मारके केली उद्ध्वस्त!!

    नाशिक : बांगलादेशाच्या निर्मितीनंतर तब्बल 54 वर्षांनी पाकिस्तानने अखेर खुन्नस काढून घेतली. बांगलादेशाची निर्मिती करणाऱ्या शेख मजीबूर रहमान यांची घरे आणि स्मारके पाकिस्तान प्रेरित तथाकथित आंदोलकांनी बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केली.

    बंगाली भाषकांचे आंदोलन उभे करून शेख मुजीबूर रहमान यांनी 1971 मध्ये पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळवत स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. त्यांना भारताचे फार मोठे सहाय्य झाले होते. पाकिस्तानी लष्करी आणि नागरी राज्यकर्त्यांच्या मनामध्ये यासंबंधीचा राग वर्षानुवर्षे खदखदत होता. त्यातून त्यांनी भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधात असंख्य घातपाती कारस्थाने आखली. डाव रचले. परंतु, भारताविरुद्धचा दहशतवाद आणि थाउजंड कट्स किंवा ऑपरेशन टोपाज सारखी घातपाती कारस्थाने भारताविरुद्ध यशस्वी होऊ शकली नाहीत. उलट भारत जास्तीत जास्त प्रबळ बनत गेला. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी धोरण बदलत थेट बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली घातपाती कारवाया सुरू केल्या. त्याला लोकशाहीचा मुलामा दिला आणि अखेर बांगलादेशाची निर्मिती करणाऱ्या शेख मजीबूर रहमान यांची घरे आणि स्मारके विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली‌.



    बांगला देशातल्या विद्यार्थ्या आंदोलकांनी काल आणि आज ढाक्यातील “धनमंडी 32 ” (Dhanmondi 32) हे शेख मजीबूर रहमान यांचे निवासस्थान आग लावून आणि बुलडोजर चालवून उध्वस्त केले. इतकेच नाही, तर सिल्हेट जिल्ह्यातील त्यांचे घर आणि स्मारक त्याचबरोबर माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचे दिवंगत पती वाजेद मियां यांचे ढाक्यातले मधील घर आंदोलकांनी पेटवून दिले. शेख मजीबूर रहमान यांच्या बंधूंचे खुलना मधील शेखबाडीतले घर देखील पेटवून दिले. नंतर बुलडोझर चालवून उध्वस्त केले. शेख मजीबूर रहमान यांची कुठलीही आठवण बांगलादेशात उरताच कामा नये याची “व्यवस्था” पाकिस्तान पुरस्कृत विद्यार्थी आंदोलन आंदोलकांनी करून टाकली.

    पण शेख मुजीबूर रहमान यांची घरे आणि स्मारके उध्वस्त करण्याचे विद्यार्थ्यांचे आंदोलन काल पुन्हा अचानक उफाळले असे नाही, तर त्याला दोन महत्त्वपूर्ण घडामोडींची पार्श्वभूमी राहिली. सगळ्या जगभरात वेगवेगळ्या सरकारांविरुद्ध उत्पात माजवणाऱ्या जॉर्ज सोरोस यांचा मुलगा अलेक्स सोरोस जानेवारी महिन्याच्या अखेरीस बांगलादेशी प्रमुख मोहम्मद युनूस यांना भेटला. मोहम्मद युनूस लोकशाहीचे तारणहार आहेत, असा गौरव त्याने त्या भेटीत केला. त्या भेटीत ओपन सोसायटी फाऊंडेशनने बांगलादेशी सरकारला करोडो टकांची देणगी दिल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने बांगलादेशी लष्कराच्या तुकडी बरोबर एकत्र येऊन लष्करी सराव केला. 1971 च्या युद्धानंतर हे पहिल्यांदा घडले. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या प्रमुखांनी बांगलादेशाला भेट दिली. बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्यांशी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या दोन महत्त्वपूर्ण घडामोडी बांगलादेशात घडल्या आणि त्यानंतरच कालपासूनचे विद्यार्थी आंदोलन पुन्हा उफाळून आले. शेख हसीना वाजेद यांच्या भाषणाचे त्याला एक निमित्त देण्यात आले. शेख हसीना यांनी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना 6 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यापूर्वीच विद्यार्थी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून शेख मजीबूर रहमान यांच्या सगळ्या आठवणी बांगलादेशातून पुसून टाकाव्यात, असे कारस्थान रचले. त्यातूनच त्यांची घरे आणि स्मारके पूर्णपणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने तब्बल 54 वर्षानंतर आपली खुन्नस काढून घेतली.

    पण शेख मजबूर रहमान यांची घरे उद्ध्वस्त करत असताना विद्यार्थी आंदोलकांच्या नेत्यांनी मात्र भारताविरुद्ध गरड ओकली शेख हसीना भारतात राहून तिथून कुठल्याही कारवाया करत असतील, तर त्याला भारत सरकार जबाबदार राहील, अशी दर्पोक्ती विद्यार्थी नेता नाहीद इस्लाम याने केली. यातूनही पाकिस्तानचे कारस्थान उघड्यावर आले.

    Demolition of Dhanmondi 32 continues in the morning

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक