वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली राष्ट्रमंचाची बैठक ही सगळ्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी व्यासपीठाची प्रतिनिधी आहे, असा दावा बैठकीत सहभागी झालेले सीपीआयचे खासदार बिनय विश्वम यांनी केला आहे.democratic Left forces against a most hated govt that has failed. The country needs a change.
राष्ट्रमंचच्या बॅनरखाली ही बैठक सुरू असून या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशातल्या लोकांना बदल हवा आहे. सध्याचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असा दावाही बिनय विश्वम यांनी केला आहे.
पण या बैठकीत डाव्या पक्षांचा सहभाग पाहता ममता बॅनर्जी नाराज असल्याचे समजते. आणि काँग्रेस देखील या मंचाच्या बैठकीतून वगळल्याबद्दल शरद पवारांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसला वगळून तिसरी आघाडीसाठी पवार प्रयत्न करत असल्याने काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे.
राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजिद मेमन, वंदना चव्हाण, सीपीआयचे विनय विश्वम, आम आदमी पार्टीचे शुशील गुप्ता, समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी, ज्येष्ठ वकिल के टी एस तुलसी, ल्यूटन्स दिल्लीतील पत्रकार करण थापर, आशुतोष, आरएलडीचे जयंत चौधरी, माजी खासदार शाहीद सिद्दीकी, ओमर अब्दुल्ला, गीतकार जावेद अख्तर हे उपस्थित आहेत.
democratic Left forces against a most hated govt that has failed. The country needs a change.