वृत्तसंस्था
रायपूर : छत्तीसगडसह 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर तब्बल 9 दिवसांनी आम आदमी पार्टीला जाग आली आहे आणि पक्षाने छत्तीसगड मधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. Demand to change polling date in Chhattisgarh
केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2023 रोजी पत्रकार परिषद घेऊन 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजस्थानातली मतदानाची तारीख 23 ऐवजी 25 नोव्हेंबर अशी निवडणूक आयोगाने बदलून जाहीर केली होती.
पण आता छत्तीसगड मधल्या आम आदमी पार्टीला मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातली 17 नोव्हेंबर ही तारीख खटकली आहे. त्यामुळे पक्षाने छत्तीसगडमध्ये 17 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबरला मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे. 17, 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड मध्ये छठ पर्व येते. त्याच्या पूजाअर्चेमुळे लाखो महिला मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे छत्तीसगड मधले दुसऱ्या टप्प्यातली मतदान 17 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबरला घ्यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम आदमी पार्टीला तब्बल 9 दिवसांनी जाग आल्याने निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेईल??, या विषयी दाट शंका वाटते.
Demand to change polling date in Chhattisgarh
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडून कोण असू शकतो पंतप्रधानपदाचा उमेदवार? शशी थरूर यांनी केला खुलासा
- समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने ३ विरुद्ध २ मतांनी फेटाळली!!; का?? आणि कशी?? वाचा तपशील!!
- ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
- Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार