• Download App
    एकीकडे दुष्काळाची मागणी, दुसरीकडे "इंडिया" आघाडीच्या बैठकीत पंच पक्वानांची ताटे सजली!! Demand for famine on the one hand, “India

    एकीकडे दुष्काळाची मागणी, दुसरीकडे “इंडिया” आघाडीच्या बैठकीत पंच पक्वानांची ताटे सजली!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळाची मागणी होत आहे, तर दुसरीकडे “इंडिया” आघाडीच्या बैठकीत पंच पक्वांनांची ताटे सजली आहेत. Demand for famine on the one hand, “India

    “इंडिया” आघाडीच्या बैठकीपूर्वी आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांना मेजवानी देणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रीयन वडापाव पासून पुरणपोळीपर्यंत वेगवेगळी पंच पक्वांने खास या नेत्यांसाठी तयार करण्यात आली आहेत.

    एकीकडे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. पाणीटंचाईचे संकट समोर आले आहे. अख्खा खरीप हंगाम धोक्यात आहे आणि दुसरीकडे “इंडिया” आघाडीचे हेच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्याची भाषा करत पंच पक्वानांच्या पंगती झोडणार आहेत. हे विसंवादी चित्र मनसेने जनतेसमोर आणले आहे. मनसेचे नेते आणि चित्रपटा आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर यांनी या संदर्भातले ट्विट केले आहे.

    हे ट्वीट असे :

    राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे.

    – अमेय खोपकर सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना

    Demand for famine on the one hand, India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट