• Download App
    नरेंद्र गिरी मृत्युप्रकरणाचे गूढ कायम, सीबीआय चौकशीची शिफारस |Demand for CBI enqiry in Nardragiri case

    नरेंद्र गिरी मृत्युप्रकरणाचे गूढ कायम, सीबीआय चौकशीची शिफारस

    वृत्तसंस्था

    प्रयागराज – आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्युप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी प्रयागराज येथील वाम्घबरी मठात पंख्याला लटकलेला आढळून आला होता.Demand for CBI enqiry in Nardragiri case

    घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आणि यात त्यांनी आपल्या शिष्यासह तीन जणांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून सध्या १८ सदस्यीय एसआयटीचे पथक तपास करत आहे.



    संतांच्या मते, नरेंद्र गिरी हे आत्महत्या करू शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर यायलाच हवे. यासाठी उच्चस्तरीय चौकशी गरजेची आहे, अशी मागणी होऊ लागली. समाजवादी पक्ष, कॉंग्रेससह अनेक पक्षांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

    भाजपचे खासदार साक्षी महाराजांनी देखील सुसाईड नोटवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, की ज्या व्यक्तीला सही करण्यासाठी बराच वेळ लागत असे, तो मोठी सुसाईड नोट लिहू शकत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.

    Demand for CBI enqiry in Nardragiri case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!

    Kulbhushan Jadhav : कुलभूषण पाकिस्तानातील हायकोर्टात करू शकणार नाहीत अपील; फक्त कॉन्सुलर सहाय्य प्रदान केले