• Download App
    Delta Variant : लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक : WHOचा इशारा। Delta variant: Delta variant more dangerous if vaccination is not accelerated: WHO warns

    Delta Variant : लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक : WHOचा इशारा

    जगभरातील जवळपास 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार


    डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.


    अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता .


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाविरोधात (Covid-19)लढत आहे. जगावर असलेले कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी सगळीकडे लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आता डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) अधिक जीवघेणा ठरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हण्टले आहे. Delta variant: Delta variant more dangerous if vaccination is not accelerated: WHO warns

    जगभरातील जवळपास 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरिएटचा जास्त प्रसार होण्याच्या आधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन देखील जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

    सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे. येत्या 2022 सालापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

    Delta variant: Delta variant more dangerous if vaccination is not accelerated: WHO warns

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार