विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी मत चोरीचा केलेला आरोप दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना नाही पटला; बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत NSUI ला दिला दणका!!, ही महत्वपूर्ण घडामोड आज घडली. Delhi University
दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत सव्वा लाखांपेक्षा जास्त मतदार असलेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यापैकी 60000 पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर न होता बॅलेट पेपर वर झाली. विशेषत: राहुल गांधींनी मतदान चोरीवरून देशभर गदारोळ उठवला असताना ही निवडणूक पार पडली.
पण तरी देखील उच्च शिक्षण घेत असलेल्या दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना राहुल गांधींचा हा काही आरोप पटला नाही. त्यांनी काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने उभे केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पराभवाचा दणका दिला. संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना विजयी केले. अभाविप 3 आणि काँग्रेस एन एस यु आय 1 असा निकाल लागला.
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अ भा वि प चा उमेदवार आर्यन मान याने एन एस यु आय ची महिला उमेदवार जोस्लिन नंदिता चौधरी हिचा दणकून पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे जोस्लिन नंदिता चौधरी हिचे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अकाऊंटवर लाखो फॉलोवर्स आहेत. परंतु तिला त्यातली विजयी होण्याइतपत काही हजार मते सुद्धा मिळवता आली नाहीत. तिला 12 हजार 645 मते मिळाली, तर
आर्यन मान याला 28 हजार 841 मते मिळाली. सोशल मीडियातला तुफान प्रचार सुद्धा जोस्लिन नंदिता चौधरी हिच्या कामी आला नाही. तिचे शाळेतले नाव जितू चौधरी असे होते परंतु नंतर तिने जोस्लिन हे नाव घेतले त्यामुळे त्यांनी धर्म बदलल्याची चर्चा जोरदार झाली.
Delhi University students reject Rahul Gandhi’s vote rigging allegation
महत्वाच्या बातम्या
- Jaish-e-Mohammed, : ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदचे कुटुंब मारले गेल्याची जैशची कबुली; सशस्त्र दहशतवाद्यांच्या रॅलीत कमांडरचे वक्तव्य
- दिवस ढळला, मोदींच्या रिटायरमेंटची मावळली आशा; पण विरोधकांसाठी खुली झाली “संधीची” नवी दिशा!!
- Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही
- Supreme Court : धर्मांतर कायद्यांवर सुप्रीम कोर्टाची 8 राज्यांना नोटीस; 4 आठवड्यांत मागितले उत्तर मागितले