वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नवी दिल्ली ते लंडन बससेवेला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी १५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ७० दिवसांचा प्रवास हा १८ देशांतून होणार आहे. सप्टेंबरपासून सेवेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. Delhi to London bus service may start from September
७० दिवसांच्या या प्रवासात पर्यटक २० हजार किमी प्रवास करणार आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये पहिली सफर सुरु होईल असे सांगितले जात आहे.
लग्झरी बसमधून दिल्ली ते लंडन प्रवासाची सुविधा अॅडव्हेन्चर ओव्हरलँड ही खासगी कंपनी सुरु करत आहे.
पर्यटक १८ देशातून प्रवास करतील.१५ लाख रुपये त्यासाठीचा खर्च करावा लागेल. मात्र त्यात तिकीट, व्हिसा, विविध देशात राहण्याची सुविधा मिळणार आहे. या २० सीटर बस मध्ये प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र केबिन, खाणे पिणे, झोपण्याची सुविधा मिळणार आहे. तब्बल ४६ वर्षानंतर दिल्लीलंडन बससेवा सुरू होत आहे.