• Download App
    दिल्लीत डेंगीचा कहर, तीन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्या |Delhi shows highest patients of dengue

    दिल्लीत डेंगीचा कहर, तीन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्या

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या दिल्लीत डेंगीचा कहर सुरु आहे. याची तीव्रता गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.दिल्लीत २०१५ मध्ये केवळ ऑक्टोबर या एकच महिन्यात १०,६०० रुग्ण आढळले होते.Delhi shows patients patients of dengue

    यंदा गेल्या महिन्यातील संख्या हजारपेक्षा थोडीच जास्त होती, पण नोव्हेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतच रुग्णसंख्या चार आकड्यांत गेली.२०१७ मध्ये दिल्लीत दहा जणांचा डेंगीने बळी गेला होता. सोमवारी तीन रुग्ण दगावले. गंगा राम रुग्णालयात रोज उपचारासाठी येणाऱ्या डेंगीच्या रुग्णांची संख्या ८० ते १०० च्या दरम्यान आहे.



    एरवी दिवाळीच्या सुमारास हिवाळा सुरु होत असताना डेंगीची रुग्णसंख्या घटते, पण यंदा कोरोना निर्बंध हटविण्यात आल्यामुळे ती वाढली असावी असे डॉक्टरांचे मत आहे. लोक फार ढिलाई दाखवीत आहेत आणि पावसाळ्यानंतर काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा इशाराही या तज्ज्ञांनी दिला.

    बांधकाम सुरु असलेल्या इमारती आणि खचाखच गर्दी झालेल्या बाजारपेठांत अनेक ठिकाणी पाणी साचून गढूळ बनते. त्यामुळे डासांची पैदास होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.शेजारील उत्तर प्रदेश राज्यासह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) इतर भागांत डेंगीचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळेही संसर्ग वाढत असावा, अशी शक्यता या तज्ज्ञांनी व्यक्त केली.

    Delhi shows highest patients of dengueDelhi shows highest patients of dengue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड,

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!