वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिल्लीत कोरोना संक्रमण वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने. यलो अलर्ट जारी केला. दिल्लीत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. तर मेट्रो, रेस्टॉरंट, बार ५० टक्के क्षमतेने सुरु असतील. याशिवाय सिनेमा हॉल, स्पा, जिम, मल्टीप्लेक्स, हॉल, ऑडिटोरियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद ठेवण्यास सांगितले. Delhi schools, colleges closed; The increasing transition to corona led to drastic decisions
दिल्लीत काय सुरु, काय बंद?
- शाळा, कॉलेज, सिनेमाहॉल, बॅक्वेंट हॉल, जिम, स्पा बंद राहतील परंतु, सलून सुरु राहतील
- दुकाने, मॉल सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहतील. ऑड-ईव्हन नियमानुसार ती सुरु राहतील
- मेट्रो आणि बस ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील
- ऑटो, ई-रिक्शा, टॅक्सीमध्ये २प्रवाशांनाच परवानगी
- रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. सकाळी८ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी
- खाजगी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी
- लग्नात २० लोकांना परवानगी
- धार्मिक स्थळांच्या ठिकाणी परवानगी नाही