विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल मधला निष्कर्ष खरा ठरताना दिसतोय. दिल्लीत अरविंद केजरीवालांची सत्ता जाऊन तिथे भाजप सत्तेवर येताना दिसतोय. विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे आणि वेबसाईट यांनी जरी भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात जोरदार टक्कर होत असल्याचे चित्र दाखवले असले, तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कलानुसार सकाळी साडेदहा वाजता भाजप 42 जागांवर तर आम आदमी पार्टी 28 जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसला आत्ता तरी शून्य जागेवर आघाडी मिळाली आहे.
अगदी सुरुवातीला अरविंद केजरीवाल, अतिशी, मनीष सिसोदिया हे आम आदमी पार्टीचे बडे नेते पिछाडीवर होते. परंतु आता ते आघाडीवर आल्याचे चित्र दिसत आहे.
परंतु हे अगदी सुरुवातीचे कल असून निवडणुकीच्या आता मोजणीच्या अजून 15 ते 16 फेऱ्या होणे अपेक्षित आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.
Delhi results: According to the official information of the Election Commission, BJP is leading 42, Aam Aadmi Party 28!!
महत्वाच्या बातम्या
- US H-1B visa : अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल अन् संजय सिंह यांची चौकशी करण्यासाठी ACBचे पथक रवाना
- S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?
- फडणवीसांनी राहुल गांधींवर केला कव्हर फायरिंगचा आरोप; पण मग केजरीवालांनी काय केलं??