• Download App
    बलात्कार - विनयभंगाचे वक्तव्य : राहुल गांधी पोलीस चौकशीत मागताहेत मुदत; काँग्रेसचा मात्र 45 दिवस झोपलात का??, पोलिसांना सवाल Delhi Police went to Rahul Gandhi’s residence despite he had said he will give answer in 8-10 days.

    बलात्कार – विनयभंगाचे वक्तव्य : राहुल गांधी पोलीस चौकशीत मागताहेत मुदत; काँग्रेसचा मात्र 45 दिवस झोपलात का??, पोलिसांना सवाल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी श्रीनगर मध्ये काही महिलांचा हवाला देऊन बलात्कार आणि विनयभंग या संदर्भात गंभीर वक्तव्य केले होते. या त्यांच्या वक्तव्याबद्दल विशिष्ट माहिती घेण्यासाठी दिल्लीचे पोलीस राहुल गांधींच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी राहुल गांधींनी दिल्ली पोलिसांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. परंतु, त्यांच्याकडे कायदेशीर उत्तर देण्यास विशिष्ट मुदत मागितली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र दिल्ली पोलिसांवरच आगपाखड करून 45 दिवस झोपला होतात का??, असा सवाल केला आहे. Delhi Police went to Rahul Gandhi’s residence despite he had said he will give answer in 8-10 days.

    हे प्रकरण असे :

    राहुल गांधी भारत जोडो यात्रेत श्रीनगर मध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्यांना काही महिला भेटल्या आणि त्यांनी आपल्यावर काही जवळच्याच लोकांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याच्या कहाण्या राहुल गांधींना सांगितल्या. त्यावर राहुल गांधींनी आपण पोलिसांकडे जाऊ या, असे त्या महिलांना सूचविले. परंतु त्या महिलांनी पोलिसांकडे गेलात तर आम्हाला आणखीन दुष्कर्म सहन करावे लागेल, अशी भीती व्यक्त केली. राहुल गांधींनी या घटनेचा उच्चार त्यांच्या श्रीनगर मधल्या जाहीर सभेत केला. त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. परंतु या घटनेचे एकूण गांभीर्य लक्षात घेऊन राहुल गांधींना कोणत्या महिला भेटल्या आणि त्यांनी नेमके बलात्कार आणि विनयभंग या संदर्भात काय सांगितले??, याची चौकशी करणे दिल्ली पोलिसांना अगत्याचे वाटले. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यावेळी राहुल गांधींनी या पोलिसांना आपल्या निवासस्थानी तीन तास बसवून ठेवले आणि नंतर नोटीस स्वीकारली.

    आज राहुल गांधींच्या निवासस्थानी पुन्हा एकदा पोलीस गेले वरिष्ठ पोलिस अधिकारी सागर प्रीत हुडा त्यांच्याशी बोलले. त्यावेळी राहुल गांधींनी पोलिसांच्या काही प्रश्नांना जरूर उत्तरे दिली. परंतु या संदर्भात आणखी काही कायदेशीर उत्तरे देण्यासाठी मुदत मागितली.

    मात्र या घटनेवरून काँग्रेसने केंद्र सरकारलाच घेरले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हस्तक्षेपाशिवाय दिल्लीचे पोलीस राहुल गांधींपर्यंत पोहोचू शकत नाहीत. राहुल गांधी सध्या गौतम अदानी प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत असल्यामुळे राहुल गांधींवर सरकार डूख धरून आहे. राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारला देता येत नाहीत म्हणून राहुल गांधींना वेगळ्या प्रकरणात अडकवण्याचे सरकारचे कारस्थान आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला. श्रीनगर मध्ये भारत जोडो यात्रा संपून 45 दिवस झाले तोपर्यंत दिल्ली पोलीस झोपले होते का??, असा सवाल अशोक गेहलोत आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

    पण त्यामुळे एक राजकीय विसंगती तयार झाली. एकीकडे राहुल गांधींनी पोलिसांकडे कायदेशीर उत्तर देण्यासाठी विशिष्ट मुदत मागितली आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते दिल्ली पोलिसांना 45 दिवस झोपला होतात??, काय असा सवाल केला. त्यामुळे काँग्रेसची या सर्व गंभीर प्रकरणात नेमकी भूमिका काय??, असा सवाल तयार झाला आहे.

    Delhi Police went to Rahul Gandhi’s residence despite he had said he will give answer in 8-10 days.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!