वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वृद्ध आई-वडिलांचे स्टेटमेंट दिल्लीचे पोलीस रेकॉर्ड करणार नाहीत, पण त्याआधीच चौकशी आणि तपासाचा अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी मोठा गवगवा केला.
स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानात त्यांचा पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली. या प्रकरणाचा प्रचंड मोठा गदारोळ संपूर्ण देशभर झाला. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांमध्ये जाऊन जबानी दिली. त्या जबानी वर आधारित पोलिसांनी गुन्हे नोंदवून चौकशी आणि तपास सुरू केला. बिभव कुमार याला अटक करून पोलीस कोठडीत ठेवले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणात नेमके काय झाले??, याबद्दल संबंधितांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही स्टेटमेंट नोंदवली. यापुढे जाऊन अरविंद केजरीवालांचे वडील आणि आई यांची स्टेटमेंट पोलीस नोंदवणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.
परंतु प्रत्यक्षात पोलीस केजरीवालांच्या वृद्ध आई-वडिलांचे स्टेटमेंट नोंदवणार नाहीत. तरीदेखील केजरीवाल यांनी ट्विट करून मी दिल्ली पोलिसांची वाट बघतो आहे. ते माझ्या घरी कधी येणार आणि माझ्या आई-वडिलांचे स्टेटमेंट कधी नोंदवणार??, याविषयी त्यांनी मला काही कळवलेले नाही, असे वक्तव्य केले. त्यावर अतिशय मार्लेना यांनी दिल्ली पोलिसांनी आता ओलांडली आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या वृद्ध आई-वडिलांचे स्टेटमेंट नोंदवून त्यांना खोट्या प्रकरणात गुंतवण्याच्या बेतात आहे, असा कांगावा अतिशय मार्लेना यांनी केला.