विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: तुम्हाला माहित आहे का की दिल्लीमधील पहिली दाखल झालेली तक्रार कोणती होती? पोलीस अॅक्टखाली १८६१ मध्ये एक तक्रार दाखल झाली होती. १६० वर्षांपूर्वी १८ ऑक्टोबर रोजी मोहम्मदयार खान रा. कत्रा शिश महल यानी ४५ आणे किंमत असलेल्या वस्तू घरातून चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. उत्तर दिल्लीमधील सब्जी मंडी पोलिस स्टेशनमध्ये सदर तक्रार दाखल झाली होती. त्यामध्ये हुक्का, स्वयंपाकाची भांडी, कुल्फी व आईस्क्रीम चोरी झाल्याचे सांगितले होते.
Delhi Police first ever FIR in 1861 was recorded for stolen Hookkah
ही FIR दिल्ली पोलिस म्यूझीयममधे प्रदर्शनासाठी ठेवली आहे. दिल्ली पोलिसांनी फ्रेम केली आहे.
दिल्लीत १८६१ मध्ये मुंडका, मेहरौली, कोतवाली, सब्जी मंडी आणि सदर बाजार अशी पोलिस स्टेशन होती. त्यावेळी ११ संत्री चोरीला गेल्याची, तसेच पायजमे चोरी झाली अशा तक्रारी पण नोंद झाल्या आहेत. हा एक खास ऐतिहासिक प्रसंग आहे.
Delhi Police first ever FIR in 1861 was recorded for stolen Hookkah
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न