• Download App
    दारू घोटाळ्यावर एकही शब्द बोलले नाहीत, पण उद्या भाजप कार्यालयावर धडक मारून तुरुंगात जायची केजरीवालांची तयारी!! Delhi Police arrested Chief Minister Arvind Kejriwal's PA Bibhav Kumar in Swati Maliwal beating case

    दारू घोटाळ्यावर एकही शब्द बोलले नाहीत, पण उद्या भाजप कार्यालयावर धडक मारून तुरुंगात जायची केजरीवालांची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार याला अटक केल्यानंतर संतप्त झालेल्या अरविंद केजरीवालांनी उद्या भाजप कार्यालयावर धडक मारून तुरुंगात जायची तयारी चालवली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ जारी करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे, पण हे आव्हान देताना अरविंद केजरीवालांनी स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण किंवा दिल्लीतला दारू घोटाळा याविषयी एकही शब्द उच्चारलेला नाही. Delhi Police arrested Chief Minister Arvind Kejriwal’s PA Bibhav Kumar in Swati Maliwal beating case

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंग आणि मी यांना तुरुंगात घातले. आता ते आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनाही तुरुंगात घालायच्या तयारीत आहेत, पण असे एक – एक करून आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तुरुंगात घालण्यापेक्षा आम्ही उद्या सगळेच भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढतो. आम्हाला सगळ्यांनाच एकत्र तुरुंगात टाका, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ जारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

    दिल्लीमध्ये मी 500 आधुनिक शाळा उभारल्या, 500 पेक्षा जास्त मोहल्ला क्लिनिक उभारून दिल्लीच्या जनतेचे आरोग्य सुधारले, दिल्लीच्या जनतेला मोफत वीज उपलब्ध करून दिली. दिल्लीच्या जनतेसाठी मी गेली दहा वर्षे झटलो. हे सगळे नरेंद्र मोदींना नको आहे. त्यामुळेच त्यांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले, पण असे एक – एक करून तुरुंगात टाकण्यापेक्षा त्यांनी माझ्यासकट सगळ्या सहकाऱ्यांना एकदमच तुरुंगात टाकावे म्हणून मी उद्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसह दिल्लीच्या भाजप मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. नरेंद्र मोदींनी आम्हा सगळ्यांना एकदम तुरुंगात टाकावे, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिले.

    पण या सगळ्यांमध्ये दिल्लीतल्या ज्या दारू घोटाळ्यासाठी अरविंद केजरीवालांना तुरुंगात जावे लागले किंवा ज्या शिक्षण घोटाळ्यासाठी सत्येंद्र जैन यांना तुरुंगात जावे लागले किंवा ज्या स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याबद्दल बिभव कुमार याला तुरुंगात जावे लागले, या कुठल्याही विषयावर अरविंद केजरीवालांनी आपल्या अख्ख्या व्हिडिओमध्ये एक अवाक्षरी उच्चारले नाही. आपल्या वरचे सगळे आरोप मात्र त्यांनी विषय डायव्हर्ट करून फेटाळून लावले.

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आता फक्त अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांवरच आरोप पत्र दाखल झालेले नसून, दारू घोटाळ्यातला पैसा आम आदमी पार्टीने गोवा निवडणुकीत वापरला याचे पुरावे देऊन संपूर्ण आम आदमी पार्टी विरोधच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या संदर्भात अरविंद केजरीवाल किंवा त्यांचे सहकारी एकही शब्द बोलले नाहीत.

    Delhi Police arrested Chief Minister Arvind Kejriwal’s PA Bibhav Kumar in Swati Maliwal beating case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य