• Download App
    दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 7.2 तीव्रता, चीन-नेपाळ सीमेवर होते केंद्र Delhi-NCR Earthquake, 7.2 Magnitude, Epicenter on China-Nepal Border

    दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 7.2 तीव्रता, चीन-नेपाळ सीमेवर होते केंद्र

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्ली आणि एनसीआरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे हे धक्के इतके जोरदार होते की, अनेक भागांतील लोक घाबरून घराबाहेर पडले. Delhi-NCR Earthquake, 7.2 Magnitude, Epicenter on China-Nepal Border

    भूकंप का होतात?

    पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा त्या घासतात. जेव्हा ते एकमेकांवर चढतात किंवा दूर जातात तेव्हा जमीन थरथरू लागते. याला भूकंप म्हणतात. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्युड स्केल म्हणतात.

    रिश्टर तीव्रता स्केल 1 ते 9 पर्यंत आहे. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रस्थानावरून मोजली जाते. म्हणजे त्या केंद्रातून बाहेर पडणारी ऊर्जा या स्केलवर मोजली जाते. 1 म्हणजे कमी तीव्रतेची ऊर्जा बाहेर येत आहे. 9 म्हणजे सर्वोच्च. अतिशय भयावह आणि विनाशकारी लहर. ती दूर जात असताना कमजोर होत जाते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 असेल तर त्याच्या सभोवतालच्या 40 किलोमीटरच्या त्रिज्येत जोरदार धक्का बसतो.

    Delhi-NCR Earthquake, 7.2 Magnitude, Epicenter on China-Nepal Border

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार