विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – दिल्लीच्या आमदारांना आता ९० हजार रुपयांचे मासिक वेतन आणि भत्ते मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केंद्राकडून आलेल्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.Delhi MLA salary hiked
तत्पूर्वी प्रत्येक आमदाराला ५३ हजार रुपये वेतन मिळत होते. त्यात १२ हजार वेतन आणि अन्य भत्त्याचा समावेश आहे.गेल्या दहा वर्षात आमदारांच्या वेतनात वाढ झाली नव्हती. त्यामुळे केजरीवाल सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला वेतन आणि भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती.
नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक आमदाराला ३० हजाराचे वेतन आणि ६० हजाराच्या भत्त्याचा समावेश आहे. एवढी वेतनवाढ होवूनही दिल्लीच्या आमदारांना देशात सर्वात कमी वेतन मिळते, असा दावा केजरीवाल यांनी केला.
Delhi MLA salary hiked
महत्त्वाच्या बातम्या
- इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका फेटाळली, प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी म्हणत याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंड
- झाशीच्या राणीला योगी आदित्यनाथांचे अभिवादन, झाशी रेल्वे स्टेशनला देणार वीरांगणा लक्ष्मीबाई यांचे नाव
- कंगाल पाकिस्तान : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकने पंतप्रधानांचे निवासस्थान काढले भाड्याने, गेस्ट हाऊसपासून लॉनपर्यंत रेंटने मिळणार
- आता मध्य प्रदेशात पावसाचा कहर : पुराच्या विळख्यात 1171 गावे, बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण