• Download App
    दिल्ली मेट्रोची घोषणा, 'त्या' महिलेच्या कुटुंबाला १५ लाखांची नुकसान भरपाई देणार|Delhi Metro announced to pay Rs 15 lakh compensation to the family of that Death woman

    दिल्ली मेट्रोची घोषणा, ‘त्या’ महिलेच्या कुटुंबाला १५ लाखांची नुकसान भरपाई देणार

    • अन् तिच्या मुलांच्या शाळेचा खर्चही उचलणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकून घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. डीएमआरसीकडून महिलेच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.Delhi Metro announced to pay Rs 15 lakh compensation to the family of that Death woman



    इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर झालेल्या अपघाताची चौकशी केल्यानंतर दिल्ली मेट्रोने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डीएमआरसी मेट्रो ट्रेन अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये भरपाई देत असे, मात्र या घटनेनंतर या रकमेत १० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही अतिरिक्त मदत तिच्या मृत्यूमुळे प्रभावित झालेल्या महिलेच्या दोन लहान मुलांना दिली जाणार आहे.

    गुरुवार, १४ डिसेंबर रोजी नांगलोई येथील रहिवासी ३५ वर्षीय महिला रीना दिल्लीच्या इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर मेट्रो ट्रेनच्या दरवजात अडकली होती. ती आपल्या मुलासोबत प्रवास करत असताना तिची साडी ट्रेनच्या दारात अडकली आणि ती मेट्रो ट्रेनसोबत लांबपर्यंत ओढत गेली. त्यानंतर मेट्रो ट्रेन पुढे गेल्यावर ती रुळावर पडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला ताबडतोब सफदरजंग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, जिथे 16 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता.

    Delhi Metro announced to pay Rs 15 lakh compensation to the family of that Death woman

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही