या गाड्या ‘नमो भारत’ या नावाने ओळखल्या जातील.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाला आज पहिली सेमी हायस्पीड रॅपिडएक्स ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून रॅपिड एक्स ट्रेन कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिबााबाद ते दुहई या १७ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर धावणार आहे. त्यानंतर हे अंतर काही मिनिटांत पार करता येईल. या गाड्या ‘नमो भारत’ या नावाने ओळखल्या जातील. 21 ऑक्टोबरपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांचे ऑपरेशन सुरू होणार आहे. Delhi Meerut RRTS India will get its first RapidX Train today Prime Minister Modi will inaugurate the first phase
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2019 मध्ये दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली होती आणि आज ते त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. मोदी आज सकाळी 11 वाजता गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादला पोहोचतील. यानंतर ते कॉरिडॉरची पाहणी करतील आणि त्यानंतर रॅपिड एक्स ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत.
रॅपिड एक्स ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही या ट्रेनमधून प्रवास करणार आहेत. मोदी तिकीट काढल्यानंतर ट्रेनमध्ये चढतील आणि साहिबााबाद ते दुहईपर्यंत ट्रेनमध्ये प्रवास करतील. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एनसीआरसीटीचे अधिकारीही ट्रेनमध्ये प्रवास करणार आहेत. यानंतर मोदी वसुंधरा येथे मोठ्या जनसभेला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.
Delhi Meerut RRTS India will get its first RapidX Train today Prime Minister Modi will inaugurate the first phase
महत्वाच्या बातम्या
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती
- मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
- पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!
- WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी