• Download App
    Delhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे... । Delhi Lockdown For Six days from today, read 10 Highlights

    Delhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…

    Delhi Lockdown : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील कोरोनाचे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, मी कधीही जनतेला चुकीची माहिती दिली नाही. लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 जणांना सहभागी होता येईल. समारंभात सहभागी होण्यासाठी पास जारी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे पास असेल अशाच व्यक्तींना लग्न समारंभात हजर राहता येईल. Delhi Lockdown For Six days from today, read 10 Highlights


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील कोरोनाचे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, मी कधीही जनतेला चुकीची माहिती दिली नाही. लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 जणांना सहभागी होता येईल. समारंभात सहभागी होण्यासाठी पास जारी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे पास असेल अशाच व्यक्तींना लग्न समारंभात हजर राहता येईल.

    मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आम्ही चाचण्या कमी होऊ दिल्या नाहीत. ते म्हणाले की, दिल्लीत सर्वात जास्त टेस्टिंग झाली आहे. अनेक राज्यांनी आपली आकडेवारी लपवली, टेस्टिंगच्या संख्येत हेराफेरी केली.

    केजरीवाल म्हणाले की, आता दिल्लीत आयसीयूचे बेड जवळजवळ संपले आहेत. इथल्या रुग्णालयांत औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. आता दिल्लीत चौथी लाट आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत 20 हजारांहून अधिक रुग्णांच्या नोंदी होत आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

    दरम्यान, रविवारी एकाच दिवसात कोरोनाच्या 25,462 नवीन रुग्णांची नोंद झाली. संसर्गाचे प्रमाण 29.74 टक्क्यांपर्यंत वाढले. याचाच अर्थ दिल्लीत प्रत्येक तिसऱ्या नमुन्यात संसर्ग आढळत आहे. यावरून तेथील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

    दिल्ली लॉकडाऊनशी संबंधित 10 ठळक मुद्दे…

    1. सोमवारी रात्री 10 ते पुढच्या आठवड्यात सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन राहील.
    2. खासगी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवली जातील. घरून काम करण्यास सांगितले जाईल.
    3. इतर राज्यांतून येण्यास कोणतेही बंधन नाही.
    4. आवश्यक सेवांशी संबंधित लोकांना पास दिले जातील.
    5. मॉल, जिम, स्पा आणि सभागृह बंद राहतील.
    6. 50 लोकांना लग्नात येण्याची मंजुरी. त्यासाठी परवानगी अगोदरच घ्यावी लागेल.
    7. मेट्रो सेवा दिल्लीत सुरूच आहे, पण त्यासाठी पास करणे अनिवार्य असेल.
    8. दूध, फळे आणि भाजीपाला दुकाने खुली ठेवली जातील.
    9. विनाकारणा बाहेर पडल्यास कारवाई केली जाईल.
    10. राजधानी दिल्लीत कोरोना नियमाविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाईल.

    Delhi Lockdown For Six days from today, read 10 Highlights

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!