• Download App
    Delhi is suffocating under AAP rule Bansuri Swaraj criticized the Kejriwal government

    ‘आप’च्या राजवटीत दिल्ली गुदमरत आहे’ बांसुरी स्वराज यांनी केजरीवाल सरकारवर केली टीका

    आम आदमी पक्षाचे सरकार प्रदूषणाबाबत कोणतेही धोरण बनवू शकत नाही.

    विशेष प्रतिनिधी

    दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता (AQI) दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्यातील वाढत्या प्रदूषणावरून भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. Delhi is suffocating under AAP rule Bansuri Swaraj criticized the Kejriwal government

    भाजप नेते बांसुरी स्वराज यांनी आप सरकारवर हल्लाबोल करताना सांगितले की, आम आदमी पक्ष यू-टर्न घेण्यात माहीर आहे. आता प्रदूषणाचेच उदाहरण घ्या, 18 नोव्हेंबर 2020 रोजी मंत्री आतिषी यांनी एक ट्विट केले होते, ज्यात असे म्हटले होते की, डेटामुळे त्यांना कळले आहे की दिल्लीतील प्रदूषण हे पराळी जाळण्यामुळे होते. ज्यास हरियाणा आणि पंजाबमुळे कारणीभूत  आहे.

    सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांची भाजपा दिल्ली स्टेट लीगल सेलच्या राज्य सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांसुरी स्वराज म्हणाल्या, “दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, हरियाणाचा एक छोटासा भाग हा उत्तरेकडे आहे, बाकीचा भाग पंजाबमध्ये आहे ज्यामुळे दिल्लीत प्रदूषण होते. 18 नोव्हेंबर 2020 रोजी हे विधान दिल्यानंतर, आतिशा 25 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणाल्या की त्यांचाकडे कोणताही अधिकृत डेटा नाही. जेणेकरून आम्हाला कळेल की दिल्लीत प्रदूषण का आहे?

    ते म्हणाले की, आम आदमी पक्षाचे सरकार प्रदूषणाबाबत कोणतेही धोरण बनवू शकत नाही. मला त्यांना विचारायचे आहे की दिल्लीतील 53 टक्के प्रदूषण हे पंजाबमध्ये पराळी जाळल्यामुळे होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास दिल्लीत प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ, असा मोठा दावा तुम्ही केला होता. मग आज काय झालं, पंजाबमध्ये आणि दिल्लीतही तुमचं सरकार आहे. पण दिल्लीच्या प्रदूषणासाठी तुम्ही काहीच करत नाही.

    Delhi is suffocating under AAP rule Bansuri Swaraj criticized the Kejriwal government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार