दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मनीष सिसोदिया सीबीआय आणि ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. Delhi High Court rejects AAP leader Manish Sisodians bail
जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, मनीष सिसोदिया हे दिल्ली सरकारमध्ये प्रभावी पदावर आहेत. अशा स्थितीत जामीन मिळाल्यावर साक्षीदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. सिसोदिया २६ फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. बुधवारी त्यांनी 103 दिवसांनी पत्नी सीमा सिसोदिया यांची भेट घेतली. या भेटीनंतर सीमा सिसोदिया यांनी ट्विटरवर एक पत्रही जारी केले होते.
Delhi High Court rejects AAP leader Manish Sisodians bail
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिली पक्ष प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- रात्रीस खेळ चाले; अजितदादांसह 9 मंत्र्यांवर राष्ट्रवादीने टांगली अपात्रतेची तलवार!!; विधानसभा अध्यक्षांना पाठविला ई-मेल आणि व्हॉट्स एप!!
- मोदींची 2019 ची मूळ योजना फलद्रूप; भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र, काँग्रेस एकाकी, त्यात ठाकरे – पवारांची भर!!