विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे दारू धोरण ठरवताना झालेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व्यक्तिशः सामील होते, याचा स्पष्ट खुलासा सक्तवसुली संचलनालय अर्थात ED दाखल केलेल्या केस मधून झाला असल्याचे परखड निरीक्षण नोंदवून दिल्ली हायकोर्टाने केजरीवालांना जबरदस्त चपराक हाणली आहे. Delhi High Court Order makes grave observations on kejriwal
अरविंद केजरीवाल आपल्यावरचे सगळे आरोप झटकत असले तरी प्रत्यक्षात ED ने सादर केलेली कागदपत्रे आणि दाखल केले पुरावे याच्यातून हे स्पष्ट दिसून येते की अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्यामध्ये व्यक्तिशः सामील होते. त्या घोटाळ्यातली रक्कम गोव्याच्या निवडणुकीत वापरण्यात आली हे केवळ त्यांना माहिती होते असे नाही, तर त्या कारस्थानात त्यांचा सहभाग होता. कारण ते आम आदमी पार्टीचे सर्वात वरिष्ठ नेते म्हणजे निमंत्रक आहेत. त्यामुळे त्यांच्या माहितीशिवाय आणि सहभागाशिवाय पक्षाचे कुठलेही महत्त्वाचे निर्णय होत नाहीत. दारू घोटाळ्यात हवाला रॅकेट मधून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत वापरण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला होता. त्या निर्णयात अरविंद केजरीवाल व्यक्तिशः सामील होते. हेच ED ने सादर केलेल्या कागदपत्रांवरून आणि दाखल केलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होते, असे स्पष्ट निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदविले आहे.
अरविंद केजरीवालांनी आपल्यावरचा प्रत्येक आरोप फेटाळताना आपला दारू घोटाळ्याशी संबंधच नाही, असा युक्तिवाद केला. दारू घोटाळ्यातल्या पैसा गोवा निवडणुकीत वापरण्यात आल्याचे आपल्याला माहिती नव्हते. दारू घोटाळ्यात अटक केलेल्या सगळ्या आरोपींचा मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांच्याशी संबंध होता. ते सगळे रिपोर्टिंग त्या दोघांनाच करत होते. त्याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती, असा युक्तिवाद केजरीवालांनी वारंवार केला.
मात्र, आता दिल्ली हायकोर्टाने ED च्या कागदपत्रांच्या हवाल्याने नोंदविलेल्या परखड निरीक्षणातून अरविंद केजरीवाल हेच यातले मुख्य कारस्थानी होते. त्यांनीच हवाला रॅकेट मधून मिळवलेला दारू घोटाळ्यातला सगळा पैसा गोवा निवडणुकीत वापरण्यास परवानगी दिली, हे स्पष्ट झाले आहे. मात्र अरविंद केजरीवाल हायकोर्टाच्या निर्णयाशी सहमत नसून ते आता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.
Delhi High Court Order makes grave observations on kejriwal
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेत्यांशी संबंधित संघटना RSSच्या नावाचा करत आहे गैरवापर – भाजपचा आरोप!
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; इनाम असलेल्या तिघांसह १२ नक्षलवाद्यांना अटक!
- भाजपने केली मोठी मागणी! बंगालमध्ये निवडणुकीनंतरही केंद्रीय सुरक्षा दल तैनात ठेवावे
- उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकर “सेफ गेम”साठी मैदानात; पण ईडीच्या नोटीशी पुढे मुलगा टिकेल का निवडणुकीत??