• Download App
    हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी, बार, रेस्टॉरंट मालकांना नियम अनिवार्य । Delhi HC gives nod to herbal hukka parlor

    हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी, बार, रेस्टॉरंट मालकांना नियम अनिवार्य

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील विविध पब आणि रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्क्याच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करत लोकांच्या रोजीरोटीवर गदा आणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान मांडले. Delhi HC gives nod to herbal hukka parlor

    विविध रेस्टॉरंट आणि बारच्या मालकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेताना न्या रेखा पल्ली यांनी हे निर्देश दिले. केवळ कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत हे नियम कायमस्वरूपी चालू ठेवता येणार नाहीत. प्रशासनाने याआधीच सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि कार्यक्रमासाठीच्या सभागृहांना परवानगी दिली असल्याचे न्या.पल्ली यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने आज बार आणि रेस्टॉरंट चालकांना हा दिलासा देतानाच त्यांना कोरोना नियमांचे मात्र सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले.



    आता याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये असे सांगतानाच न्यायालयाने संसर्गाची परिस्थिती बदलल्यास मात्र सरकार न्यायालयामध्ये दाद मागू शकते असे म्हटले आहे. या याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यावर दिल्ली सरकारने आपले म्हणणे मांडावे असेही न्यायालयाने नमूद केले. स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्गाचे कारण देत हुक्का बारवर निर्बंध घातले होते.

    Delhi HC gives nod to herbal hukka parlor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा