विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चार टँकरमधून ७० टन प्राणवायू वाहून आणणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसचे आगमन आज सकाळी राजधानीत झाले. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराने आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने बेहाल झालेल्या नवी दिल्लीला थोडा दिलासा मिळाला आहे.Delhi gets 70 ton oxygen by railway
हा ऑक्सिजन दिल्ली सरकारतर्फे विविध रुग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ‘#ऑक्सिजन एक्स्प्रेस’ छ्त्तीसगडमधील रायगडमधून रुग्णांसाठी ऑक्सिजन घेऊन दिल्लीला पोचली आहे.
कोरोनाविरुद्धच्या आपल्या एकत्रित लढ्यात जीव वाचविण्यासाठी भारतीय रेल्वे शक्य ते सर्व प्रयत्न करीत असून देशभरात प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध करीत आहे, ’ असे ट्विट केले आहे.
ही ऑक्सिजन एक्स्प्रेस दिल्ली कँट रेल्वे स्थानकावर सकाळी पोचली. रायगड येथील जिंदाल स्टिल वर्क्स कारखान्यातून या रेल्वेने रविवारी (ता.२५) रात्री दिल्लीकडे कूच केले होते. फोर्टिस, मॅक्स, बी.एल. कपूर रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये हा ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे.